मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित.
उदगीर प्रतिनिधी....... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव ता.उदगीर येथील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार दिनांक 25/5/2019 रोजी चैतन्य सभागृह पिंपरी-चिंचवड पुणे येथे मा. श्री सुनील खळदकर माजी पोलीस आयुक्त पुणे, मा.शुभांगिणी सांगळे मिसेस इंडिया क्विन आॅफ वेस्ट विजेती,मा.रश्मिकुमार अब्रोल जेष्ठ कृषी तज्ञ पुणे,मा. राजेंद्र सगर काव्य मित्र संस्था महाराष्ट्र, मा. राजेश दिवटे संस्थापक अध्यक्ष यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणे, मा. राधा दिवटे सचिव यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था पुणे,मा. विलासराव वाळके,मा.जीवनराव पांचाळ, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे सरांना या पुर्वी सामाजिक, राष्ट्रीय व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवाराकडून अभिनंदन केले आहे