Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 31, 2022

हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित लिहलेला लेख

*हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन*

    30 जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन. या निमित्ताने जाणून घेऊया महात्मा गांधी यांचे बहुमोल योगदान. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील किनारपट्टी असलेल्या पोरबंदर येथे  झाला. वडिलांचे नाव
करमचंद गांधी, आईचे नाव पुतलीबाई, पत्नी कस्तूरबाई. 
महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क,सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. महात्मा गांधी आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणातसर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ.स.१९३० मध्ये इंग्रजांनी  लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ.स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्येभारत पाकिस्तान फाळणी मुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.  महात्मा गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी  दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये हत्या करण्यात आली.  थोर महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन.
-----------------------------
  श्री ज्ञानेश्वर बडगे
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर
-----------------------------

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी*

*तिवटग्याळ . - आज  दिनांक 30/1/2022 रोजी कोविड - 19 नियमांचे पालन करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे  महात्मा गांधी यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वैभव नरहरे व गावातील अन्य नागरिक यांनी महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर थोर महात्मा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शाळेत दोन मिनिट स्तब्धता ( मौन )पाळून बापूजीच्या चरणी विनम्र अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व नागरीकांना आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दिवस असल्याने आपण आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहे असे सांगितले व  आज हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती  दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे ,अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वैभव नरहरे व व शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

Saturday, January 29, 2022

महात्मा गांधी यांच्या विषयी सविस्तर माहिती

*📘📚🇮🇳 महात्मा गांधी 🇮🇳📚📗*

    *महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ला गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण त्यांच्या मनात आई वडिल व गुरूजनांविषयी अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले.*

   *इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले. काही दिवस वकिली म्हणून काम केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते. त्यांच्यावर फारच अन्याय होत असत. भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला. शेवटी त्याचा जय झाला.*

   *गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते. म्हणून त्यांना लोक 'बापू' म्हणत. तसेच त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.*

   *इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा विधायक मार्गाचा वापर करून भारताला १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.*

   *देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली. एका देशाचे दोन देश निर्माण झाले. • काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली. ते काळाच्या पडद्याआड गेले.*
======================

बदली प्रक्रिया मध्ये संवर्ग 1,2 बाबत सक्षम पुरावा असे असावे

बदली प्रक्रिया मध्ये संवर्ग 1,2 बाबत सक्षम पुरावा असे असावे

Friday, January 28, 2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव येथे लेक शिकवा अभियानाअंतर्गत आदर्श मातांचा सत्कार.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव येथे लेक शिकवा अभियानाअंतर्गत आदर्श मातांचा सत्कार.

उदगीर-२६ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक​ शाळा शाळा नविन वसाहत रावणगाव ता. उदगीर. येथे मोठ्या उत्साहात लेक शिकवा अभियानाअंतर्गत महीला मेळावा आयोजित करण्यात आला... प्रारंभी सरपंच प्रल्हादराव सुर्यवंशी. शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अकबर पटेल. शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे.शिक्षिका संजीवनी गौतमवार. शाळा व्यवस्थापन​ समिती च्या सदस्या अर्चना गायकवाड आदि मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर .तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.प्रास्ताविका मध्ये मु.अ. ज्ञानेश्वर बडगे यांनी ३ ते २६ जानेवारी पर्यंत राबविण्यात आलेल्या लेक शिकवा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांची​ माहिती दिली. आज महिला मेळाव्यात   
प्रतिवर्षी यंदा ही आदर्श मातांचा सत्कार करण्यात येणार आहे असे सांगितले. तसेच सरपंच प्रल्हादराव सुर्यवंशी  कार्यक्रमाचे अध्यक्ष. प्रमुख पाहुणे अकबर पटेल. मष्णाजी गायकवाड. खमर सय्यद. मूनीर फकीर.अर्चना गायकवाड.खलील 
सय्यद.  आदिंचा सत्कार करण्यात आला.
या नंतर​ आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.
१.अर्चना गायकवाड
२.उषा सुर्यवंशी
३.नसरीन सय्यद
४.नजमा सय्यद
५.कविता कांबळे
६.तैसीम सय्यद
७.शाहीन सय्यद
८.रहीमा सय्यद
९.रूक्मिण गायकवाड
१०.जैतुन सय्यद
११.तस्लीमबी पटेल.
आदि आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच प्रल्हादराव सुर्यवंशी. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे. शिक्षिका संजीवनी गौतमवार. यांनी महीला मेळाव्यातील उपस्थित सर्वांना आई.वडील. शिक्षक यांनी मुलांवर चांगले संस्कार देणे गरजेचे आहे असे सांगितले. या तिन्हीचा मूलावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. आजच्या पिढीला सुसंस्कारित करणे खूप आवश्यक आहे. स्त्री शिक्षणाचे महत्त्व. पालकांची जबाबदारी. शिक्षकांची जबाबदारी. लेक शिकवा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका संजीवनी गौतमवार. आभार मु.अ. ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
  या वेळी शाळेचे विद्यार्थी. शिक्षक. शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य. महिला पालक  आदी जन उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नविन वसाहत रावणगाव येथे लेक शिकवा अभियानाअंतर्गत आदर्श मातांचा सत्कार.

  या वेळी शाळेचे विद्यार्थी. शिक्षक. शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य. महिला पालक  आदी जन उपस्थित होते.

M. A. Education, M. Ed पात्र शिक्षकांना वर्ग 1 व वर्ग 2 पदावर सामावून घेण्यात यावे यासाठी पाठपुरावा आदर्श शिक्षक समिती महाराष्ट्र

M. A. Education, M. Ed पात्र शिक्षकांना वर्ग 1 व वर्ग 2 पदावर सामावून घेण्यात यावे यासाठी पाठपुरावा आदर्श शिक्षक समिती महाराष्ट्र

तालुका पुरस्कार फाॅर्म प्रस्ताव

M. Ed, M. A. Education, m.phil, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना वर्ग 1,वर्ग - 2 पदावर सामावून घेण्यात यावे यासाठी माहिती प्रपत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे परिपत्रक

M. Ed, M. A. Education, m.phil, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना वर्ग 1,वर्ग - 2 पदावर सामावून घेण्यात यावे यासाठी माहिती प्रपत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे परिपत्रक

Thursday, January 27, 2022

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...

*वाचनीय महत्त्वाची माहिती 👇* 

*🇮🇳15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक ...*
🇮🇳 
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
*1)*  15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा     *फडकवतात*  तर ...   26 जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 
कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     
************                                                                      

*2)*  15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)*  म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला*  जातो. त्याला *(flag unfurling)*  म्हणतात. 
************   

*3)* 15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात.         तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                              ***************    

*4)*  15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो.               *************      

_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._

 *🇳🇪वंदे मातरम*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖

10 20 30 ची आश्वासित योजना शिक्षकाना लागू

*🌈10 20 30 ची आश्वासित योजना शिक्षकाना लागू होणार ....👌*

सेवेत असताना पुढील शिक्षण घेण्यासाठी खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे या बाबतीत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे परिपत्रक दिनांक 5/12 /2021 *

सेवेत असताना पुढील शिक्षण घेण्यासाठी खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे या बाबतीत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर यांचे परिपत्रक दिनांक 5/12 /2021 

Wednesday, January 26, 2022

भारत विशेष - सामान्यज्ञान

======================
*🛑भारत विशेष - सामान्यज्ञान 🛑*

*(१) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?*
*उत्तर -- १५ ऑगस्ट*

*(२) भारताचा प्रजासत्ताक दिन कोण़ता ?*
*उत्तर -- २६ जानेवारी*

*(३) भारताचा राष्ट्रध्वज कोणता ?*
*उत्तर -- ‌तिरंगा*

*(४) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?*
*उत्तर -- जनगणमन*

*(५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?*
*उत्तर -- हॉकी*

*(६) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*
*उत्तर -- वाघ*

*(७) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?*
*उत्तर -- मोर*

*(८) भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते ?*
*उत्तर -- वड*

*(९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?*
*उत्तर -- आंबा*

*(१०) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?*
*उत्तर -- कमळ*

*(११) भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?*
*उत्तर -- गंगा*

*(१२) भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते ?*
*उत्तर -- ताजमहल*

*(१३) भारताचे राष्ट्रीयगीत कोणते ?*
*उत्तर --  वंदेमातरम्*

*(१४) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?*
*उत्तर -- डॉल्फिन मासा* 

*(१५) भारताची राष्ट्रभाषा कोणती ?*
*उत्तर -- हिंदी*

*(१६) आपल्या देशाचे नाव काय  ?*
*उत्तर -- भारत*

*(१७) भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य कोणते ?*
*उत्तर -- सत्यमेव जयते*
======================

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा* 

तिवटग्याळ ....... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26/1/2022 रोजी सोशल डिशटंश व कोविड - 19 नियमाचे पालन करुन 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक  व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके व सदस्य, सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे   यांनी प्रजासत्ताक दिना विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, उपसरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, उपाध्यक्ष श्री कैलास तवर, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री देविदास पाटील, उमाकांत पाटील, गजानन नरहरे, नवनाथ कच्छवे, आकाश पाटील, कैलास तवर, ग्राम सेवक प्रशांत ढगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार,मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, गिताताई कच्छवे रादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व राजकुमार श्रीमंगले प्रवीण कांबळे, प्रशांत कांबळे तसेच गावातील शिक्षक प्रेमी नागरिक आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.