मेडिकल बिल आजार यादी
Friday, May 31, 2024
Tuesday, May 28, 2024
महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळाच संपुर्ण क्षणचित्रे
~~~~~~ ~~~~~~
_नाशिक येथे पार पडलेल्या कार्यक्रमाची बातमी एका क्लीकवर अवश्य पहा..._
~~~~~~ ~~~~~~
बातमी पत्र व्हिडिओ
👇👇👇
==============
पुरस्कार्थीं फोटो
👇
इतर फोटो
👇
संपुर्ण बातमीपञ डेन केबल नेटवर्क*_
_*चँनेल नंबर ८२३ वर दररोज सकाळी १० वा.राञी १० वा.नाशिक जिल्हा वृत्तवाहिनी*_
==============
*जिल्हा समन्वयक*
*◆ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
_सौजन्य- *महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*_
माहेर कडून हृदयपुर्वक सत्कार, महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार 2024 निमित्ताने श्रीमती आशा काळे यांचा माहेर कडून सत्कार
*माहेर कडून हृदयपुर्वक सत्कार*
-----------------------------
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार 2024 निमित्ताने श्रीमती आशा काळे यांचा माहेर कडून सत्कार*
*उदगीर - श्रीमती आशा सुर्यकांत काळे यांना नाशिक येथे महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार 2024 मिळालाबद्दल स्वगृही माहेर कडून सपत्नीक भाऊसाहेब आनंद काळे, मोठी बहीण सौ. वैशाली पाचंगे, छोटी बहीण सौ. सुनिता गरुड यांनी माहेर कडून सपत्नीक भर आहेर साडी, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व पेढा भरून अभिनंदन करुन हृदयपुर्वक सत्कार करण्यात आला.*
श्रीमती आशा काळे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल चा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्काराने सन्मानित
श्रीमती आशा काळे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल चा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्काराने सन्मानित*
नाशिक - महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार दिला जातो.या वर्षी उदगीर तालुक्यातील शेल्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षीका श्रीमती आशा सुर्यकांत काळे (बडगे) यांना नाशिक येथे गुरु दक्षिणा हॉल सभागृहात 24 मे 2024 रोजी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे, कवि अनंत राऊत,महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे अध्यक्ष मा. दीपक चामे व आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे अध्यक्ष मा. दिपक चामे, राज्य समन्वयक रंगनाथ सगर, विकी येलमटे, चंद्रकांत गोरगिळे, जिल्हा समन्वयक मा. उबेद शेख, अशोक पांडे, बाळासाहेब कांबळे, शांता लोहारे, सुनिता भंडे, संगीता स्वामी, ज्ञानेश्वर बडगे, शेल्हाळ शाळेतील मुख्याध्यापीका अंजली स्वामी, शाळेतील शिक्षीका मंगल केंद्रे, सुशीला बन, सोजर जांभळे, कावेरी पांचाळ,रमेश हंगरगे, पांडुरंग पेठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. दिलीप चिखले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लांडगे आदी जणांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Subscribe to:
Posts (Atom)