Saturday, January 12, 2019
रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने भाषा संगम उपक्रम साजरा. उदगीर प्रतिनिधी......... दिनांक 12/1/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने भाषा संगम हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे.शिक्षीका सुनिता पोलावार,कलावती मेहत्रे, सुरेखा जाधव यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. शिक्षीका सुनिता पोलावार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.शाळेतील विद्यार्थी गायकवाड सुविधा ,गायकवाड यशवंत . पटेल समीर. गायकवाड आदर्श.कांबळेआशा,गायकवाड प्रांजली. सय्यद तैरीम. गायकवाड रोहित.शेख इस्राईल. यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित गीत सादरीकरण केले, या गीतांनी शालेय वातावरण खुप दणदणून गेले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज आपल्या शाळेत भाषा संगम हा उपक्रम राबवयाचा आहे असे सांगितले. सर्व विद्यार्थी हिंदू, मुस्लिम,ख्रिश्चन, या विविध धर्माचे पोषाख घालून संवाद साधला. नमस्कार,तूझे नाव काय आहे, कोणत्या इयत्ता मध्ये आहे,तुझे गाव कोणते आहे. अशा विविध वाक्याने सर्व विद्यार्थ्यांनी संवाद साधला.हा उपक्रम राबविताना सर्व विद्यार्थी आनंदी व उत्साहीत झाले. विद्यार्थी खूप रममान झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेचे शिक्षीका सुनिता पोलावार ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment