Monday, January 7, 2019
रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी उदगीर प्रतिनिधी......... दिनांक 3/1/2019 रोजी रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे. यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.शाळेतील विद्यार्थी इयत्ता पहिली तील गायकवाड सुविधा व गायकवाड यशवंत . पटेल समीर.यांनी खुप सुंदर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.तसेच गायकवाड आदर्श.कांबळे आशा.गायकवाड प्रांजली. सय्यद तैरीम. गायकवाड रोहित.शेख इस्राईल. यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर भाषणे दिली.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित खूप सुंदर गीत साऊ पेटी मशाल, धन्य सावित्री माता,गोड गुणांची गोड मनाची माता सावित्रीबाई फुले,वसा सावित्री चा आम्ही जागवू हे गीत सादरीकरण केले, या गीतांनी शालेय वातावरण खुप दणदणून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment