मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज ध्वजारोहण व लोकार्पण सोहळ्यात शेल्हाळ व बेलसकरगा शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती.
लातुर वार्ता---------दिनांक 18/1/2019 रोजी सकाळी ठिक 9.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना.विनोद जी तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मराठवाड्यातील सर्वाधिक उंचीचा तिरंगा ध्वज आज लातूर येथे फडकला. दीडशे फूट उंच असलेल्या तिरंगाचे ध्वजारोहण आणि लोकार्पण सोहळा आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लातूरच्या क्रीडा संकुलावर करण्यात आला. लातूरच्या क्रीडा संकुल मैदानावर देशभक्तीचे प्रतीक असणाऱ्या राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडला. मराठवाड्यातील सर्वात उंच असलेल्या १५० फूट उंचीच्या तिरंगा ध्वजवंदनच्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील, आमदार विक्रम काळे, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सीईओ विपीन इटनकर, जि. प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांच्यासह कार्यक्रमासाठी अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थी व असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्हिडिओ गेम छोडो मैदानसे नाता जोडो असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. लातूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात चांगले आणि सुसज्ज क्रीडा संकुल उभे करणार असल्याचंहि सांगितलं. लातुरात मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वज राष्ट्रभक्तीचे प्रतीक असल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले.
याप्रसंगी ११ राष्ट्रभक्तीपर गीतांचं गायन देखील करण्यात आले. मनमोहक दृश्याने सर्वांचीच मने जिंकली. मोठ्या थाटात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या सोहळ्यासाठी उदगीर तालुक्यातील शेल्हाऴ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बेलसकरगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व श्रीमती मंगल केंद्रे, आशा काळे,ज्ञानेश्वर बडगे, चंद्रकांत कांबळे आदी शिक्षकांनी सोहळ्यास उपस्थिती नोंदवली.
No comments:
Post a Comment