Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 26, 2020

*बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने संविधान दिन  साजरा.*


  बोळेगाव बु.......... दिनांक 26/11/2020 रोजी शोशल डिष्टंश नियमांचे पालन करुन बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने      26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर व श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार


 अर्पण करून अभिवादन केले.  तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री  सुभाष नरवडे यांनी संविधान तयार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेत्या विषयी व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानाच्या कार्या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आज 26/11 /2008 रोजी शहिद झालेल्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे,विजय साळसकर, प्रकाश कामठे, तुकाराम ओंबळे, इतर अधिकारी यांच्या विषयी शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील यांनी माहिती दिली सांगुन दोन मिनिटे मौन धारण करून आदरांजली वाहिली. . या कार्यक्रमाचे सूत्र 


  


 संचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवाडे व  आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे  यांनी मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे व शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, सुभाष नरवडे व शिक्षिका मजलसा पुठ्ठेवाड, आशा मुळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment