Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, January 20, 2021

*२७जानेवारी पूर्वतयारी🔴【इ.५,६,७,८ वर्ग सुरू करण्यासाठी】

🔴 *२७जानेवारी पूर्वतयारी*🔴
【इ.५,६,७,८ वर्ग सुरू करण्यासाठी】
1️⃣ *वर्ग निर्जंतुकीकरण करवून घेणे*(ग्रा.पं.तर्फे किंवा स्वतःऔषध आणून)
2️⃣ दररोज शिक्षक,विद्यार्थी, कर्मचारी यांची ताप मोजण्यासाठी *थर्मल गन खरेदी करणे.* [समग्र अनुदानातून]
3️⃣ *ऑक्सिमीटर खरेदी करणे* [समग्र अनुदानातून]...ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी
4️⃣मास्क मुलांना खरेदी करणे, सँनिटायझर खरेदी करणे[समग्र अनुदानातून]
5️⃣ हात धुण्यासाठी *पाणी, नळ,साबण उपलब्ध ठेवणे*
...स्वच्छता संकुल स्वच्छ ठेवणे,वापरात ठेवणे, निर्जंतुक ठेवणे...
6️⃣ ५,६,७,८वर्गांना विषय वा शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या सर्व
*शिक्षकांनी RTPCR ही कोरोना चाचणी करवून घेणे,* प्रमाणपत्र शाळेत ठेवणे.
7️⃣ कुठल्याही परिस्थितीत शाळेत हजर *शिक्षक व विद्यार्थी मास्क वापरतील.*..मास्क न वापरणाऱ्यांची गंभीर नोंद घेतली जाईल...
8️⃣शाळेत प्रत्येकी २विद्यार्थ्यांमध्ये *६फूट अंतर असेल.* शिक्षक,विद्यार्थी अंतरही ६फूट असेल... जमिनीवर वर्तुळे/चौकोन काढून त्यामध्ये मुले बसतील... *विद्यार्थी जागा दररोज एकच असेल.* डेस्क वा बाकांवर झिगझ्याग पद्धतीने६फूट अंतर असेल.
9️⃣ दररोज शिक्षक, विद्यार्थी यांची *ताप व ऑक्सिजन मोजून नोंदी घ्याव्यात.*
🔟परिपाठ होणार नाही.लघवी, पाणी  यासाठी सर्व वर्ग/ मुले यांना एकदाच सोडू नये...मुले एकत्र येणार नाहीत. शाळेत जेवणार नाहीत. स्वतःच्या वस्तू-वहीपेन, मास्क, पाणी बाटली-एकमेकांना देणार नाहीत.तोंडात, नाकात,डोळ्यांत बोट घालणार नाहीत.
1️⃣1️⃣शाळा किमान३तास,कमाल४तास भरेल..सकाळी१०ते दुपारी२ही वेळ योग्य असेल.
1️⃣2️⃣जास्त संख्या असणाऱ्या शाळेत ५०%आज व ५०%उद्या असे विद्यार्थी हजर राहतील...
1️⃣3️⃣ *पालकांचे शाळेत धाडण्यास तयार असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक आहे.* अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही...
1️⃣4️⃣ मास्क शिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नसेल...【 *जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं!*】
1️⃣5️⃣ऑनलाईन वर्ग चालूच राहतील.. शाळेत गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर द्यावा. ऑनलाईन इतर विषय घ्यावेत.
1️⃣6️⃣  *संदर्भ*- १८जानेवारी२०२१,१०नोव्हेंबर,८सप्टेंबर,२९ऑक्टोबर,१७ऑगस्ट,२२जुलै,२४जून,१५जून चे शासन निर्णय पहावेत.शाळेत ठेवावेत...
➖➖➖➖➖➖➖


No comments:

Post a Comment