Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 2, 2021

महाराष्ट्रातील सविस्तर भौगोलिक माहिती

महाराष्ट्रचा भूगोल || Geography of Maharashtra// भूगोल ठोकळा
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान :-

महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ.

सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली.

कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे.

उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.

कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते.

महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे.

सह्य़ाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे.

सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे.

महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.

महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे.

कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र

पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात.

शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली.

सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.

महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख इतर वैशिष्टय़े व जिल्हानिहाय टोपण नावे :-

भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

भारताची आर्थिक राजधानी – मुंबई.

महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

मुंबईची परसबाग – नाशिक

महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

संत्र्याचा जिल्हा- नागपूर

महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद

महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड

महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद

महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड

देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा- अमरावती.

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :

दगडी कोळसा – सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)

बॉक्साईट – कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

कच्चे लोखंड – रेड्डी (सिंधुदुर्ग)

मॅग्नीज – सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

तांबे – चंद्रपूर, नागपूर

चुनखडी – यवतमाळ

डोलोमाईट – रत्नागिरी, यवतमाळ

क्रोमाई – भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग

कायनाईट – देहुगाव (भंडारा)

शिसे व जस्त – नागपूर

देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.

——————————————————————————————————

महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :

औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा

पारस – अकोला

एकलहरे – नाशिक

कोराडी, खापरखेडा – नागपूर

चोला (कल्याण) – ठाणे

बल्लारपूर – चंद्रपूर

परळीवैजनाथ – बीड

फेकरी (भुसावळ) – जळगाव

तुर्भे (ट्रॉम्बे) – मुंबई

भिरा अवजल (जलविद्युत) – रायगड

कोयना (जलविद्युत) – सातारा

धोपावे – रत्नागिरी

जैतापूर (अणुविद्युत) – रत्नागिरी

महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :

हिमरुशाली – औरंगाबाद

पितांबरी व पैठण्या – येवले (नाशिक)

चादरी – सोलापूर

लाकडाची खेळणी – सावंतवाडी

सुती व रेशमी कापड – नागपूर, अहमदनगर

हातमाग साडय़ा व लुगडी – उचलकरंजी

विडीकाम – सिन्नर (नाशिक), अहमदनगर,सोलापूर

काचेच्या वस्तू – तळेगाव, ओगलेवाडी

रेशमी कापड – सावळी व नागभीड (चंद्रपूर),एकोडी (भंडारा)

महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम – मुंबई

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, – मुंबइ

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस – मुंबई

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज – मुंबई

कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी – मुंबई

नॅशमल केमिकल लॅबोरेटरी – पुणे

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे

वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) – औरंगाबाद

भारत इतिहास संशोधन मंडळ, – पुणे

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर – पुणे

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च – नागपूर

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) – नाशिक

अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय – मुंबई

खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

मुंबई विद्यापीठ (१८५७) – मुंबई

पुणे विद्यापीठ (१९४९) – पुणे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर – नागपूर

विद्यापीठ (१९२५)

कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती – अमरावती

विद्यापीठ (१९८३)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – औरंगाबाद

मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

शिवाजी विद्यापीठ (१९६३) – कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) – नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) – नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान – लोणेरे (रायगड)विद्यापीठ (१९८९)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) – जळगाव

कविकुलगुरू कालिदास संस्कृत – रामटेक (नागपूर)विद्यापीठ (१९९८)

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) – नांदेड

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) – नागपूर

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, – पाडेगांव (सातारा)

गवत संशोधन केंद्र, – पालघर (ठाणे)

नारळ संशोधन केंद्र, – भाटय़े (रत्नागिरी)

सुपारी संशोधन केंद्र, – श्रीवर्धन (रायगड)

काजू संशोधन केंद्र, – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

केळी संशोधन केंद्र, – यावल (जळगाव)

हळद संशोधन केंद्र, – डिग्रज (सांगली)

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज – केगांव (सोलापूर)

राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र – राजगुरूनगर (पुणे)

महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:

कृष्णाजी केशव दामले – केशवसुत

गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर

त्र्यंबक बापुजी डोमरे – बालकवी

प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार

राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज

निवृत्ती रामजी पाटील – पी. सावळाराम

माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलिअन

चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू

आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे

लातूर – हजरत सुरतशाह वलीचा दर्गा

नांदेड – शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी

कल्याण – हाजीमलंग बाबाची कबर

शिर्डी – श्रीसाईबाबांची समाधी

पंढरपूर – श्रीविठ्ठलाचे मंदिर

सेंट मेरी चर्च – बांद्रा (मुंबई उपनगर)

शेगाव – संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

महाराष्ट्रातील अष्टविनायक

गणपतीचे नाव स्थळ जिल्हा

श्री मोरेश्वर मोरगाव पुणे

श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे

श्री महागणपती रांजणगाव पुणे

श्री विघ्नहर ओझर पुणे

श्री चिंतामणी थेऊर पुणे

श्री वरदविनायक महड रायगड

श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर

महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे

शहरे/तीर्थक्षेत्रे नदी

पंढरपूर -भीमा

नेवासे, संगमनेर -प्रवरा

नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड -गोदावरी

मुळा-मुठा -पुणे

भुसावळ -तापी

हिंगोली -कयाधू

धुळे -पांझरा

देहू, आळंदी -इंद्रायणी

पंचगंगा- कोल्हापूर

वाई, मिरज, कऱ्हाड -कृष्णा

जेजुरी, सासवड -कऱ्हा

चिपळूण -वशिष्ठी

श्री क्षेत्र ऋणमोचन -पूर्णा

महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने

कृष्णा-कोयना – कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा

कृष्णा-पंचगंगा – नरसोबाची वाडी (कोल्हापूर)

मुळा-मुठा – पुणे

वैनगंगा-वर्धा – चंद्रपूर

वर्धा-वैनगंगा – शिवनी

कृष्णा-वारणा – हरिपूर (सांगली)

तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)

महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते

प्रमुख घाट रस्ते/महामार्ग

कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक

माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर

दिवे घाट पुणे ते बारामती

कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण

फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी

बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे

खंबाटकी घाट पुणे ते सातारा

पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर

आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी

चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

चिखलदरा अमरावती

म्हैसमाळ औरंगाबाद

पन्हाळा कोल्हापूर

रामटेक नागपूर

माथेरान रायगड

महाबळेश्वर, पाचगणी सातारा

तोरणमळ धुळे

लोणावळा, खंडाळा पुणे

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे

पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया

ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती

चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,

कोल्हापूर, रत्नागिरी

महाराष्ट्रातील अभयारण्ये

अभयारण्य जिल्हा

कर्नाळा (पक्षी) रायगड

माळठोक (पक्षी) अहमदनगर

मेळघाट (वाघ) अमरावती

भीमाशंकर (शेकरू खार) पुणे

सागरेश्वर (हरिण) सांगली

चपराळा गडचिरोली

नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक

देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर

राधानगरी (गवे) कोल्हापूर

टिपेश्वर (मोर) यवतमाळ

काटेपूर्णा अकोला

अनेर धुळे

भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के),

लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.

महाराष्ट्र राज्याची स्थापना – १ मे १९६०.

महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.

महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.

महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)

महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर

प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).

महाराष्ट्रात एकूण जिल्हे- ३६

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा, राज्य प्राणी- शेकरू, राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन, राज्य पक्षी- हरावत, राज्य भाषा- मराठी.

महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा –

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात – ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- ९ कोटी, ६८ लाख, ७९ हजार.

लोकसंख्येची घनता- ३१४ व्यक्ती दर चौ. कि.मी.

स्त्री-पुरुष प्रमाण- ९२२ (दरहजारी).

पुरुष साक्षरता- ८३.३ टक्के, स्त्री साक्षरता- ६७.५ टक्के (२००५- ७१.६० टक्के).

महाराष्ट्रातील : १) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर, लहान जिल्हा- मुंबई शहर

२) सर्वात जास्त पावसाचे ठिकाण – अंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर

३) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.

४) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.

५) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.

६) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.

७) सर्वाधिक लोकसंख्येची घनता – बृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.

८) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.

९) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे

अजिंठा, वेरुळ – औरंगाबाद

एलिफंटा, घारापुरी – रायगड

कार्ला, भाजे, मळवली – पुणे

पांडवलेणी – नाशिक

बेडसा, कामशेत – पुणे

पितळखोरा – औरंगाबाद

खारोसा, धाराशीव (जैर) – उस्मानाबाद

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :

जलाशय/नदी स्थळ/जिल्हा

जायकवाडी – बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर

गंगापूर – (गोदावरी) नाशिक

राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर

कोयना शिवाजी सागर – (कोयना) हेळवाक (सातारा)

उजनी – (भीमा) सोलापूर

तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

यशवंत धरण – (बोर) वर्धा

मोडकसागर – (वैतरणा) ठाणे

खडकवासला – (मुठा) पुणे

येलदरी – (पूर्णा) परभणी

बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड

No comments:

Post a Comment