Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 7, 2021

फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह( +91 9013151515)

*फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह(  +91 9013151515)*

गेल्यावर्षी पासून जगावर आलेले संकट म्हणजे कोरोना आणि यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे लसीकरण. फक्त लस घेणे हे आपले दैनंदिन आयुष्य पुर्वव्रत करण्यासाठी पुरेसे नाही. ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र तुमच्या खूप कमी येणार आहे. आगामी काळात लस प्रमाणपत्र एखाद्या ओळखपत्राइतका महत्वाचं ठरू शकतं. आताही देशाबाहेर आणि देशातही अनेक ठिकाणी प्रवास करण्यासाठी लस प्रमाणपत्र किंवा निगेटिव्ह कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
लस घेतल्यावर तुम्ही CoWin वेबसाईटवरून किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपमधून तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरून लस प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं हे सांगणार आहोत
--------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
--------------------------
यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
व्हॉट्सअ‍ॅपवरून कोरोना लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी

सर्वप्रथम +91 9013151515 हा MyGov कोरोना हेल्पडेस्कचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव करा.

वरील नंबरचा चॅट बॉक्स व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ओपन करा.

या नंबरवर 'Download Certificate' असा मेसेज टाईप करून पाठवा.

आता तुम्हाला एक OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर पाठवला जाईल.

तो ओटीपी चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा.

जर तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींची नोंदणी केली असेल तर तुम्हाला लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचे पर्याय दिले जातील.

जे प्रमाणपत्र हवं आहे ते टाईप करा.
तुम्हाला ते प्रमाणपत्र पाठवण्यात येईल, डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment