Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, September 16, 2021

गणपती बाप्पा विषयी सविस्तर लेख


*विघ्नहर्ता गणरायाचे घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना*

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. घरोघरी गणरायाचे आगमन होते. सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होतात . महाराष्ट्रासह देशभरात हा सण साजरा केला जातो. यामुळे सर्वत्र भक्तीमय, मंगलमय, आनंदी, उत्साही वातावरण असते. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पुढील काही दिवस भारावलेले असतात. अशीच सर्वांची लाडकी गणेश चर्तुथी यंदा शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 आगमन झाले. 
गणेश चतुर्थीला मखर, आरास, बाप्पा आणणे, पूजा, आरती, नैवेद्य यांची लगबग असते. नंतर प्रत्येक घराच्या प्रथेप्रमाणे दीड, पाच, सात किंवा दहा दिवस बाप्पाची सेवा केली जाते. भजन, जागरण असे कार्यक्रम रंगतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. तर सार्वजिनिक मंडळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र यंदा देखील कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करत आहेत.
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
प्रेमाने आणि श्रद्धेने पूजलेल्या गणपतीला निरोप देताना सर्वांची मनं भरुन येतात आणि आपोआप मुखातून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', हे शब्द बाहेर पडतात. 
अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शुक्रवारी, १० सप्टेंबर २०२१ रोजी झाले. करोना स्थितीमुळे मागच्या वर्षी सगळ्यांना आप्तेष्टांना भेटणे, यावर्षी देखील करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्यक्ष नाही, तरी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाज माध्यमातून आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, ओळखीच्या अनेकांना आपण गणपती बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ शुभेच्छा देऊ शकतो. ज्याची आतुरतेने सर्वच वाट पाहता अशा  गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया...
"तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
➖➖➖➖➖➖➖➖
श्री ज्ञानेश्वर बडगे 
मुख्याध्यापक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर 
  

No comments:

Post a Comment