बालसंगोपन रजा | महाराष्ट्रातील कर्मच्या-यांना घेता येणार 180 दिवस बालसंगोपन रजा
रजा कोणाला घेता येईल?
👇👇
· राज्य शासकीय महिला कर्मचारी,
· पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी,
· जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी,
· जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी,
· मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारीव पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचारी
· कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालयेयामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुषकर्मचारी,
· तसेच वर नमूद केलेल्या विविध कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची पत्नीअसाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे असे कर्मचारी (पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेलीआहे अशा पुरुष कर्मचा-यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बालसंगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी, पत्नीच्याआजाराबद्दल, तसेच आजाराबद्दलच्या निकषाबाबतस्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील. त्यानंतरच अशा कर्मचा-यास बाल संगोपन रजाविहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूर करता येईल.)
रजा किती दिवस घेता येईल?
· १८० दिवस (6 महीने)
रजेसाठीच्या अटी व शर्ती
(1) मुलांचेवय १८ वर्षे होईपर्यंतच सदर रजा लागू राहते. (बाल संगोपन रजेवर असताना मुलाच्यावयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यास, त्यादिनांकापासून पुढे सदर रजा लागू होत नाही.)
(2) एका वर्षामध्ये २ महिन्यांच्या कमालमर्यादेत सदर रजा घेता येते.
(3) सदर रजा ही उपरोक्त अट क्र.१ च्या अधिनराहून सेवा कालावधीत १/२/३/४ टप्यात (in Spells) घेता येते. तथापि, सदररजा एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त तीन टप्प्यांमध्येच (In Three Spells) घेता येते.
(4) पहिल्या २ ज्येष्ठतम हयात मुलांकरितालागू असते.
(5) शासकीय सेवेचे १ वर्ष पूर्ण झाल्यावरचसदर रजा लागू असते.
(6) अर्जित रजा व अर्धवेतनी रजा खात्यावर असलीतरी सदर रजा मंजूर करता येते.
(7) अर्जित रजा, अर्धवेतनी रजा तसेच प्रसूती रजेलाजोडून ही रजा घेता येते.
(8) एका कॅलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढीलकॅलेंडर वर्षीही सलग असल्यास ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला. त्या कॅलेंडरवर्षातील समजण्यात येते.
(9) बालसंगोपन रजेच्या कालावधीस रजेवरजाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येते.
(10) परिवीक्षाधीन कालावधीत बालसंगोपन रजामान्य करता येत नाही. तथापि, रजामंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिका-यास कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीरपरिस्थितीमुळे त्यास रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास, परिवीक्षाधीन कालावधीतही संबंधितासअपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येते.त्या प्रमाणात संबंधित महिला/पुरुष कर्मचाऱ्याचा परिवीक्षाधीन कालावधी वाढविला जातो.
(11) सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवलत (UTC) अनुज्ञेय ठरत नाही.
(12) सदर रजा हक्क म्हणून मागता येत नाही.सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेनेच सदर रजा घेता येते. संबंधितकर्मचाऱ्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही. ही बाब देखील सदर रजा मंजूरकरताना विचारात घेतली जाते.
(13) कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीननियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत, वेगवेगळ्या ठिकाणचा कालावधी एकत्रित गणला जाऊन अशाएकूण सेवेच्या कालावधीमध्ये
वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती असली तरीएकंदर १८० दिवस इतकीच बालसंगोपन रजा अनुज्ञेय होते.
(14) बालसंगोपन रजेचा हिशोब स्वतंत्रप्रपत्रात घेऊन ते सेवापुस्तकात ठेवले जाते. तसेच सेवा पुस्तकामध्ये देखील उपभोगलेल्याबाल संगोपन रजेची नोंद घेतली जाते.
(15) ज्या राज्य शासकीय कर्मचाऱ्याची सेवाकिमान दहा वर्षे होण्याच्या आधी सदर कर्मचा-यास राज्य शासनाच्या सेवेतून, राज्य शासनाव्यतिरिक्त अथवा राज्याच्याएकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही, अशा इतर सेवेत जाण्याकरिता किंवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावयाचा असल्यासअथवा कार्यमुक्त व्हावयाचे झाल्यास, अशाकर्मचाऱ्याने बाल संगोपन रजा म्हणून घेतलेल्या कालावधीतील वेतनाइतके वेतन, राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशाकर्मचा-यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येतो किंवा राज्य शासकीय सेवेतूनकार्यमुक्त होता येते. संबंधित शासकीय कर्मचा-यास तशा आशयाचे बंधपत्र (बाँड) सदररजेसाठी अर्ज करताना कार्यालयास सादर करावे लागते.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलाअसून त्याचा संकेताक २०१८०७२३१७२८३४९८०५ असा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
पुरूष कर्मचा-यासाठी बालसंगोपन रजा
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २३.०७.२०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १(XVI) मध्ये नमूद केल्यानुसार, ज्या पुरुष वर्गीय शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी पत्नीस कोणकोणते आजार असले पाहिजेत, तसेच अशा स्वरुपाचे आजार असल्याबाबत कोणकोणते निकष असावेत, याबाबत स्पष्टता बाकी होती. त्यानंतर दि. 15/12/2018 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे यामध्ये खालील प्रमाणे तरतुद करण्यात आलेली आहे.
ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न महाविद्यालयातील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी यांची पत्नी विविध आजारपणाच्या कारणास्तव जेवढ्या कालावधीसाठी अंथरुणास खिळून राहिली आहे (Bed Ridden), अथवा त्यांची पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे जेवढ्या कालावधीसाठी बाल संगोपन करण्यास असमर्थ होत आहे (Incapacitated), तेवढ्या कालावधीचे वैद्यकीय अधीक्षक (जे. जे. रुग्णालय)/जिल्हा शल्य चिकित्सक (शहरी भागासाठी)/ जिल्हा आरोग्य अधिकारी (ग्रामीण भागासाठी) यांचेकडून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर संबंधित शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास, तेवढ्या कालावधीची बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यात येते.
Bal Sangopan Leave for 180 Days | महाराष्ट्रातील कर्मच्या-यांना घेता येेते 180 दिवस बालसंगोपन रजा
शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी आंतररुग्ण आहे (Inpatient) आणि अंथरुणास खिळलेली आहे अथवा बालसंगोपन करण्यास असमर्थ आहे. हे पाहून प्रकरणपरत्वे तेवढ्या कालावधीची (१८० दिवसाच्या कमाल मर्यादेत) बाल संगोपन रजा संबंधित पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय आहे. तसेच बाल संगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर, रजा कालावधीत पत्नीचा मृत्यु झाल्यास, पतीला उर्वरित कालावधीची बाल संगोपन रजा १८० दिवसांच्या कमाल मर्यादेत अनुज्ञेय राहील.
बाल संगोपन रजेबाबत शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २३.०७.२०१८ मधील अटी व शर्ती या शासन निर्णयान्वये बाल संगोपन रजा घेणाऱ्या लाभार्थ्यांना लागू राहतील.
शासननिर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment