*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे आज 'जागतिक हात धुवा दिन' साजरा*
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज 14 /10/2021 रोजी जागतिक हातधुवा दिन असल्याने शालेय परिपाठा नंतर आज जागतिक हातधुवा दिन आहे असे सांगितले व हात धुण्यासाठी सहा पायर्या वापर करावा असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हात कसे धुवावेत कृती करुन दाखवले व सर्व विद्यार्थ्यांनी सहा पायर्या सह हात धूवून जागतिक हातधुवा दिन साजरा केला. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी जागतिक हातधुवा दिन विषयावर सविस्तर विद्यार्थ्यांना माहिती दिली. हातांची स्वच्छता राखल्यास अनेक प्रकारचे आजार दूर ठेवणे शक्य होते. त्यासंदर्भात लोकजागृती व्हावी, यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. करोना साथीच्या या काळात साबण आणि पाण्याने हात धुण्याचे महत्त्व लक्षात आले आहे. या दिनानिमित्त काही महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया
अभ्यास होत आहे. युनिसेफच्या एका अभ्यास अहवालातील निष्कर्ष असे सांगतात, की केवळ स्वच्छता संदर्भात अनुकूल वर्तनाच्या माध्यमातून जवळपास ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. केवळ महत्त्वाच्या वेळी हात स्वच्छ धुण्यामुळे डायरियासारख्या रोगाचे प्रमाण ३० ते ४८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते आणि श्वसनसंस्था संबंधी २० टक्के आजारांवर नियंत्रण आणता येते. कॉलरा, इबोला, सार्स अशा रोगांचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते.
शौचालयाचा नियमित वापर, सर्व महत्त्वाच्या वेळी साबण आणि पाण्याने हात धुणे, पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर अशा स्वच्छता सवयींचा समाजाने स्वीकार केला, की सामान्य आजारांचे जवळपास अर्ध्याहून अधिक ओझे हलके होते. म्हणजेच माणसांचे कामाचे दिवस वाढतात, आजारामुळे उत्पन्न बुडण्याचे प्रमाण घटते, शिक्षणात सातत्य राहते, वैद्यकीय सेवांवरचा ताण कमी होऊन त्या अधिक कार्यक्षम होतात, मानसिक स्वास्थ्य सुधारते. परिणामी, समाज विकासाच्या वाटेवर दोन पावले अधिक टाकायला सिद्ध होतो. अर्थात, हे सगळे जुळून यायला गरज असते ती समाजाच्या सर्व स्तरात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनाची.
समाजात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तन वाढावे, सामाजिक मूल्याचा स्वच्छता ही अविभाज्य भाग व्हावी आणि स्वच्छता हा प्रत्येकाचा स्वभावधर्म व्हावा म्हणून अनेक जण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. प्रभावी संवाद माध्यमातून सामुदायिक इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी हे प्रयत्न असतात. अनेकदा विषय ऐरणीवर यावा म्हणून विशेष दिन आयोजित केले जातात. आज साजरा होणारा 'जागतिक हात धुवा दिन' याच भूमिकेतून गेल्या बारा वर्षांपासून साजरा केला जात आहे. हा दिन साजरा करण्यामागे प्रेरणा आहे, आरोग्य संवर्धनातील स्वच्छ हातांची भूमिका अधोरेखित करण्याची. ज्या ज्या कामात म्हणून हातावर विषाणू, जीवाणू आणि घाण स्थिरावण्याची शक्यता असते, असे प्रत्येक काम केल्यावर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले, की अनेक जीवघेण्या संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते. अगदी करोनासारख्या संसर्गाची शक्यता आपण हात नेहमी स्वच्छ ठेवून ३६ टक्क्याने कमी करू शकतो, असे संशोधनदेखील समोर आले आहे. हा स्वच्छता विचार समाजाच्या परिचयाचा करून देणे, समाजमनात रुजवणे आणि वर्तनात आणण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे, हाच या 'जागतिक हात धुवा दिना'चा मूळ उद्देश.
या पार्श्वभूमीवर, भारतात अलीकडच्या काही दशकांपासून स्वच्छताविषयक सार्वत्रिक चर्चा होत आहे, देशव्यापी कार्यक्रम राबविले जात आहेत. पर्याप्त नसल्या, तरी भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. वर्तन बदलासाठी प्रयत्नही होत आहेत. तथापि, भारताला या संदर्भात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यातही स्वच्छता विषयक अनुकूल सामाजिक वर्तनाचा प्रश्न अजूनही काळजी करावी असाच आहे. सुविधा उपलब्ध असणे एकीकडे आणि प्रत्यक्ष अनुकूल वर्तन दुसरीकडे. स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनासंबंधी ही बाजू आजही म्हणावी तितकी सशक्त नाही, हा खरा चिंतेचा विषय आहे. विविध अभ्यासातून समाजाची ही उणी बाजू वारंवार समोर आलेली आहे.
भारतातील हात स्वच्छ धुण्याच्या संदर्भात 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४'च्या निष्कर्षानुसार देशात केवळ ६० टक्के कुटुंबांकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पर्याप्त पाणी आणि साबण उपलब्ध आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण केवळ ४९ टक्के इतके आहे. संसर्ग टाळण्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे २०१८' नुसार, भारतात जेवणापूर्वी हात धुणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के असून, हे प्रमाण शहरी भागात ५६ टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्के इतकेच आहे. हातांच्या स्वच्छतेसंदर्भात, शौचाहून आल्यावर हात न धुणे अत्यंत घातक ठरते. या संदर्भात 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे'च्या याच अभ्यासात असे समोर आले आहे, की भारतातील २६ टक्के लोक अजूनही शौचाहून आल्यावर हात धुवत नाहीत. शौचाहून आल्यावर हात न धुणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील ३३ टक्के लोकांचा सहभाग आहे. 'नॅशनल अॅनिवल रुरल सॅनीटरी सर्व्हे २०१८-१९'च्या अहवालानुसार देशातील केवळ ४० टक्के शाळा आणि ४२ टक्के अंगणवाड्यांमधून हात धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध आहे. या दोन्ही ठिकाणी येणारी मुले माध्यान्ह भोजन घेतात, हे या संदर्भात लक्षात घ्यावे लागेल.
एकूणच स्वच्छता, त्यातही हातांची स्वच्छता अपेक्षित स्तरावर येण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. र नियमित वापर होण्यासाठी तशी मानसिकता विकसित करणे, हे या संदर्भातील मोठे आव्हान आहे. एकट्या शासन व्यवस्थेचे हे काम असू शकत नाही. स्वच्छतेला सामाजिक मूल्याचे परिमाण द्यायचे, तर त्यासाठी समाजाच्या व्यापक सहभागाची गरज असणार आहे. अनेक व्यवस्था आणि माणसे पुढे येण्याची गरज आहे.
यंदाच्या 'जागतिक हात धुवा दिना'च्या निमित्ताने, स्वास्थ्य निर्देशांकाला उसळी घेण्याची संधी देण्यासाठी, देशातील एकशे पस्तीस कोटी लोक आपल्या दोनशे सत्तर कोटी स्वच्छ हातांचे सामर्थ्य सोबत घेऊन पुढे येतील, ही अपेक्षा. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment