Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, January 21, 2022

शिक्षकांच्या बदल्यांसाठी संवर्ग - 1* विशेष संवर्ग शिक्षक भाग १ निकष

*शिक्षकांच्या बदल्यांसाठी संवर्ग - 1*
विशेष संवर्ग शिक्षक भाग १ निकष 
👇
(संदर्भ : जिल्हा अंतर्गत बदली नवीन GR दि ७ एप्रिल २०२१ )

शासनाचे निश्चित केलेल्या नवीन जिल्हा अंतर्गत धोरणानुसार  संवर्ग १ मध्ये खालील शिक्षक विशेष संवर्ग भाग  १ म्हणून ओळखले जातील .

 1.8.1  पक्षाघाताने आजारी शिक्षक (paralysis)

 1.8.2  दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 -1 -2011                    मधील नमूद प्रारूप प्रमाणे सक्षम प्राधिकारी याचे प्रमाणपत्र आवश्यक)

            मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास                    बहिण भाऊ) तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक 

1.8.3   हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक 

1.8.4  जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक/ डायलिसिस सुरू असलेले            शिक्षक 

1.8.5  यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक 

1.8.6  कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

1.8.7  मेंदुचा आजार झालेले शिक्षक 
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
1.8.8  थॅलेसेमिया विकार ग्रस्त  मुलांचे पालक / जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदाहरणार्थ             methyl malonic acidemia (MMA) classical type )(mutase defiency व इतर आजार) (पालक            म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ) 

1.8.9  माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा 

1.8.10 विधवा शिक्षक 

1.8.11  कुमारिका शिक्षक 

1.8.12 परितक्त्या / घटस्फोटित महिला शिक्षक 

1.8.13  वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्रसैनिक हयात असेपर्यंत)


 खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक

 

1.8.15  हृदय शस्त्रक्रिया झालेली 

1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसिस सुरू                      असलेले  

1.8.17  यकृत प्रत्यारोपण झालेले 

1.8.18 कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले 

1.8.19  मेंदूचा आजार झालेले

1.8.20  थॅलेसेमिया विकार ग्रस्त असलेली


(संदर्भ : जिल्हा अंतर्गत बदली नवीन GR दि ७ एप्रिल २०२१ )
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment