Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, January 13, 2022

मकर संक्रांत सण निमित्ताने लिहलेला लेख





*आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!*

नमस्कार वाचक मित्रांनो, या लेखात आपण मकर संक्रात बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये एका स्वरूपात साजरी केली जाते. हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशीच येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करते.
तामिळनाडूमध्ये तो पोंगल नावाचा सण म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात त्याला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या उत्सवाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायण देखील या दिवशी होतो हा एक गैरसमज आहे. पण मकरसंक्रांती ही उत्तरायणपेक्षा वेगळी आहे. एका राशीपासून दुसर्‍या राशीपर्यंत सूर्याचा संक्रमण संक्रांती असे म्हणतात. एका संक्रांतीपासून दुसर्‍या संक्रांतीच्या दरम्यानच्या काळाला सौर महिना म्हणतात. जरी एकूण 12 सूर्यसंक्रांती आहेत, परंतु त्यापैकी मेष, कर्क, तुला आणि मकर संक्रांती ही मुख्य आहेत. या उत्सवाची खास गोष्ट म्हणजे ती दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते. परंतु कधीकधी हा एक दिवस आधी किंवा नंतर म्हणजे 13 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. परंतु हे फार क्वचितच घडते.
अशा प्रकारे, मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थानाशी संबंध आहे. जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीचा उष्णदेशीय ओलांडतो, तो दिवस 14 जानेवारी आहे आणि लोक हा मकर संक्रांतीचा उत्सव म्हणून साजरा करतात. दुसरीकडे जर ज्योतिष्यांचा विश्वास असेल तर या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणात सूर्याची हालचाल सुरू होते.
इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. पण हा सण 15 जानेवारीलादेखील साजरा करण्यात येतो. पण असं फार क्वचित घडतं. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने तामिळनाडू मध्ये पोंगल, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश मध्ये संक्रांती या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली. मकर संक्रांत नक्की का साजरी करतात याबद्दल मकर संक्रांतीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मकर संक्रांत म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.
मकर संक्रांत सगळीकडे साजरी करण्यात येते पण मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला आहे का? मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या आहे. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. 
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते. सूर्य राशीपरिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. जाणून घेऊया मकर संक्रांतीचा इतिहास...
आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे. 
महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत सांगितले आहे की, जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.
काही ठिकाणी हा सण पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो मात्र त्यामागे असणारे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी सकाळी उन्हात उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डीदेखील मिळते त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली. मुंबई, गुजरात अशा राज्यांमध्ये  जास्त प्रमाणात संक्रांत साजरी करण्यात येते. आता याला अगदी मोठा फेस्टिव्हलचा लुक आलेला आहे.
मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न सुचला असेलच ना? की याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. 
मकर संक्रांत आणि काळ्या रंगाचं महत्त्व 
मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे. एकतर नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येते. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांना सेलिब्रेट करण्यासाठी हा सण म्हणजे पर्वणीच असते. पण यावेळी नक्की काळा रंग का परिधान करायचा याची माहिती सर्वांनाच नसते. तसंच मकर संक्रांतीची माहिती सर्वांना असतेच असं नाही. त्याचं शास्त्रीय कारण आहे. सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रातीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे हलव्याचे दागिनेदेखील यावेळी घालण्यात येतात. अशा प्रकारे आपल्या देशात मोठ्या आनंदाने व उत्साहाने सण मकर संक्रांत सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री ज्ञानेश्वर बडगे
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment