*तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा*
तिवटग्याळ - तिवटग्याळ येथे आज दिनांक 25/1/2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने गावातील मतदार नागरिकांना बोलावून उपस्थित सर्वांना मतदाराची प्रतिज्ञा शपथ घेण्यात आली. तद्नंतर BLO 278 भाग क्रमांक चे श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना या राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने सविस्तर माहिती दिली १८ वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. यामुळे आपल्या देशाची लोकशाही अधिक मजबूत राहीली आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी या दिवशी मतदारांना मतदानाची शपथ दिली जाते.
दरवर्षी भारतामध्ये २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस (national voter day)साजरा केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे. कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे देशाचे उज्जल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरुक असणे गरजेचे आहे.
२५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी १८ वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करते.राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते सुरू करण्यात आला. १९५० मध्ये या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यामुळेच २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून दिली जाते. या वेळी BLO श्री ज्ञानेश्वर बडगे,मतदार नागरिक श्री राजकुमार तोमर, भिमराव पाटील, गंगाराम पाटील, आदी जण उपस्थित होते. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक तथा BLO ज्ञानेश्वर बडगे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment