Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, February 27, 2022

आदरणीय मित्र तथा आमचे मार्गदर्शक दैनिक राजधर्म चे जेष्ठ पत्रकार आदरणीय अंबादास जी आलमखाने यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी ला अभिजात दर्जा मिळावा या विषयावर सविस्तर लेख प्रकाशित केले त्या बद्दल सरांचे मनःपुर्वक आभार*

*आदरणीय मित्र तथा आमचे मार्गदर्शक दैनिक राजधर्म चे जेष्ठ पत्रकार आदरणीय अंबादास जी आलमखाने यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी ला अभिजात दर्जा मिळावा या विषयावर सविस्तर लेख प्रकाशित केले त्या बद्दल सरांचे मनःपुर्वक आभार




स्मार्ट राशन कार्ड मिळवा करा ऑनलाईन अर्जअसा करा अर्ज*

*स्मार्ट राशन कार्ड मिळवा* 
*करा ऑनलाईन अर्ज*
*असा करा अर्ज*
👇👇👇

*https://www.mahakrishi.in/2022/01/smart-ration-card.html?m=1*

शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिहलेला लेख



जिल्हा परिषद प्राथमिक लातूर शाळा वेळापत्रक



तिवटग्याळ गावात पल्स पोलिओ रॅली आयोजित

*तिवटग्याळ गावात पल्स पोलिओ रॅली आयोजित*

 तिवटग्याळ - तिवटग्याळ येथे अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ च्या वतीने आज दिनांक 26/2/2022 रोजी शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील महिला सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना घेऊन सर्व गावात दिनांक 27/2/2022 रोजी अंगणवाडी येथे पल्स पोलिओ लसीकरण आयोजित निमित्ताने विविध घोषणा देत देशाचे भविष्य अपंग होण्यापासून वाचवायचे आहे,देशातील प्रत्येक बालकाला पोलिओचे थेंब द्यायचे आहे.जर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता,तर वेळेवर मुलांना पोलिओडोस द्या
पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा,मुलांना पोलिओचे डोस पाजा.
पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा,
आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा.मनातून सर्व भ्रम आणि भीती काढून टाका,0-5 वर्षे पर्यंतच्या मुलांना पोलिओचे थेंब द्या.दोन थेंब
 करतात मुलांचे संरक्षण,दोन थेंबांनी संपूर्ण जीवनाचे संरक्षण.जेव्हा येई पल्स पोलियो दारी, तेव्हा आई-पालकांची खरी जिम्मेदारी अशा विविध घोषणा देण्यात आल्या. प्रथम अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे यांनी पल्स पोलिओ विषयावर सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी महिला सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व पालक अरूण पाटील आदी जण उपस्थित होते.













































Monday, February 21, 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्या बद्दल प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी





छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लिहलेला लेख


*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योध्दा, आदर्श शासन कर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा, छत्रपती शिवाजी महाराज*


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योध्दा, आदर्श शासन कर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महाराजांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजीराजे भोसले  हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतले.महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिणभारतात तंजावरपर्यंत राजधानीरायगड किल्ला पर्यंत मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. यांचा जन्म जन्मफेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे.शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. 
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला."
➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री ज्ञानेश्वर बडगे
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर
➖➖➖➖➖➖➖➖➖



प्राथमिक पदवीधर शिक्षक दर्जोन्नती होकार, नकार फार्म नमुना



Saturday, February 12, 2022

तंबाखू मुक्त शाळेचे 9 निकष सविस्तर माहिती





🚭चला करूया आपलीही शाळा तंबाखूमुक्त🚭*
-----------------------------
*शाळा तंबाखूमुक्त करावयाचे खालील प्रमाणे निकष 👇* 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग भारत सरकार द्वारा तंबाखूमुक्त मुक्त शाळांसाठी खालील नवीन नऊ निकष पारित केले आहेत.याची पूर्तता करून फोटो TOBBACO FREE APPLICATION वर खालीलप्रमाणे अपलोड कराव्यात .
*🚭निकष १)* शैक्षणिक संस्थेच्या आवारात 'तंबाखूमुक्त परिसर' असा फलक असावा.त्यावर 1800-112-356 हा क्वीटलाईन नंबर नमूद केलेला असावा.
व्हरांड्यातील फलकाचा स्वतंत्र व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासोबत एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष २)* 'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' हा फलक शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर ,प्रवेशद्वाराजवळ असावा.त्यावर 1800-112-356 हा क्वीटलाईन नंबर नमूद केलेला असावा. 
फलकाचा स्वतंत्र फोटो व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचा समूह फोटो असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ३)* शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये. उदाहरणार्थ  सिगारेट बिडी चे तुकडे  किंवा गुटखा तंबाखू चे पाऊच व  भिंतीवर आतून व बाहेरून थुंकल्याचे डाग नसावेत असा भिंतीच्या कोपऱ्याचा फोटो घ्यावा.  यासाठी मुख्याध्यापकांनी घोषणापत्र द्यावे लागते. घोषणापत्रचा एक फोटो ,शाळेचा आतील दर्शनी भागाचा ज्यावर शाळेचे नाव असावे,वर्गाच्या कोपऱ्याचा व बाहेरील कोपऱ्याचा असे तीन फोटो एकत्र कोलाज करून अपलोड करावेत.
*🚭निकष ४)* शाळेतील विद्यार्थ्यांकडून तंबाखूच्या दुष्परिणामांचे,घातक रसायनांचे,COTPA 2003 व नऊ निकषांची माहिती असणारे पोस्टर तयार करून शाळेत चिटकवणे या सोबत शिक्षक व विद्यार्थ्यांचे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ५)* शैक्षणिक संस्थेत गेल्या सहा महिन्यात किमान एक तंबाखू मुक्त नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवणे,जसे रांगोळी स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी,  मुखतपासणी ,सत्कार समारंभ ,तंबाखू मुक्तीची शपथ यापैकी एका उपक्रमाचा फोटो ज्यामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम / तंबाखूविरोधी कार्यक्रम असा उल्लेख असावा.त्याचे दोन फोटो फलकासह असावा.
*🚭निकष ६)* शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू मॉनिटर्स म्हणून कर्मचाऱ्यामधून शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी नेमले पाहिजेत. साईन बोर्डवर,चार्ट पेपरवर अथवा बॅनरवर  तंबाखू  मोनिटर्सचे नाव हुद्दा आणि फोन नंबर देखील नमूद केली पाहिजे.फलकाचा स्वतंत्र व मोनिटर्ससोबत मुख्याध्यापक व शिक्षक यांचा एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ७)* शालेय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, सेवन करणे, विक्री करणे आणि जाहिरात करणे यावर बंदी असून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुख्याध्यापक/वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात येईल याबाबतची सुचना/नोटीस मुख्याध्यापकांनी काढावी.नोटिसचा  एक फोटो व नोटीस सुचना फलकावर लावून मुख्याध्यापक यांच्यासह एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ८)* शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसर पिवळ्या रंगाचे ( Yellow line ) रेखांकित करून तेथे 'तंबाखूमुक्त क्षेत्र' असे नाव लिहून त्याचा विद्यार्थी शिक्षक यांचा शाळेच्या फलकासोबत फोटो घ्यावा.शक्य नसल्यास मैलाच्या दगडावर "तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र" असा उल्लेख करून तो 100 यार्ड अंतरावर लावून त्यासोबत फोटो काढून फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ९)* तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतीही दुकान शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डात नाही याबाबतचे मुख्याध्यापकाचे घोषणापत्र व शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो. जर एखादे दुकान असेल तर स्थानिक अधिकारी,सरपंच,तहसीलदार,आरोग्य अधिकारी,पोलीस यांना या पत्राद्वारे कळवावे. घोषणापत्राचा एक व रस्त्यावरील दर्शनी भागाचा पूर्ण संरक्षण भिंतीसह एक असे दोन फोटो अपलोड करावेत.जमत नसल्यास कोलाज करावेत.
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
         वरील सर्व निकष पूर्ण झाल्याची खात्री करून सलाम मुंबई फाऊंडेशन च्या 'टोबॅको फ्री स्कूल' या ॲप्लिकेशनवर सर्व पुराव्यांचे फोटो अपलोड करावेत त्याची सलाम मुंबई फाऊंडेशन कडून सर्व निकष पूर्ण झाल्याची खात्री करूनच शाळेला दोन वर्षांसाठी "तंबाखूमुक्त शाळा" असे प्रमाणपत्र दिले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖

तंबाखू मुक्त शाळा ही माहिती Tobacco free school या app मध्ये कशी करायची याविषयी माहिती पट व्हिडीओ
⬇️⬇️


बाला उपक्रमांतील शाळा भेट देवर्जन प्रशाला

*बाला उपक्रमांतील शाळा भेट देवर्जन प्रशाला* 


































*देवर्जन - आज दिनांक 12/2/2022 रोजी जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन  ता.उदगीर जिल्हा लातूर येथे बाला उपक्रमांसाठी अभ्यास भेट दिली असता शाळेतील  वातावरण खूप सुंदर दिसून आले,. शाळेतील विद्यार्थी अगदी शिस्तीत दिसून आले.कारण मी शाळेत पोहोचलो त्यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेत असलेल्या मैदानावर नवोपक्रम अभ्यास उपक्रम अगदी शिस्तीत उभे होते अगदी कार्य मग्न होते. शालेय परिपाठ विद्यार्थ्यांनी खूप सुंदर घेतला.परीपाठ इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी घेतला.परीपाठात शाळेतील शिक्षक श्री विवेक पवार अतिशय सुंदर मार्गदर्शन करून परीपाठ घेतला. परीपाठातील सर्व घटक अतिशय सविस्तर विद्यार्थी सांगितले. श्री विवेक पवार सरांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पासून आपण दैनंदिन व्यक्ती परीचय घा घटक घेण्यात येत आहे तरी ज्या इयत्तेचा परीपाठ आहे त्यांनी व्यक्ती परीचय साठी दैनिक थोर व्यक्ती महापुरुष यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती वाचून करुन सांगितले जावे असे सांगितले. तदनंतर भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे माझा शाळेचे उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक श्री महेश जी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शालेय परीपाठा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश जी चव्हाण यांनी आम्ही राबवत असलेला बाला उपक्रमांसाठी केलेले महत्त्व पुर्ण योगदान गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक प्रेमी व गावातील सर्व लहान थोर व्यक्ती शाळेतील शिक्षक यांच्या अथक प्रयत्नाने अडीच लाख लोक वाटा निधी जमा करून अतिशय सुंदर काम चालू आहे असे सांगितले व प्रत्यक्ष सर्व बाला उपक्रमातील व विद्यार्थाना उपयुक्त अशा अनेक संकल्पना वर्ग खोल्या, संरक्षण भिंत, व्हरंडा, मुख्याध्यापक खोली, सर्व इयत्ता च्या खोलीत, किचन शेड, विज्ञान प्रयोग शाळा खोलीत,मुला व मुलीचे शौचालय, गावातील जेष्ठ नागरिक यांच्या साठी स्वतंत्र दालन अशा विविध ठिकाणी अतिशय दर्जेदार चित्र रूपात, जगातील सात आश्चर्य यांची माहिती चित्र तसेच सविस्तर माहिती अशा अनेक विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक माहिती रंगकाम करून घेतली आहे. बाला उपक्रमांसाठी अतिशय उत्कृष्ट  दिसून आली. शाळेचे उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक श्री महेश जी चव्हाण, शाळेतील शिक्षक श्री सतीश रितपुरे, श्रीकिरण स्वामी, सुर्यकांत बिरादार, कुमार सिंदाळकर,सहदेव खेडे, जनार्दन जाधव, विवेक पवार व शाळेतील शिक्षीका श्रीमती उर्मिला नाळापुरे, मालती मुळे, माकणीकर मॅडम.यांच्याशी संवाद साधुन शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. देवर्जन शाळेतील विशेष बाब म्हणजे मला इयत्ता पहिली वर्गातील विद्यार्थ्यांना आॅफलाईन मार्गदर्शन शाळेतील शिक्षक श्री विवेक करत होते. मी स्वतः विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. श्री विवेक पवार सर इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. सर्व विद्यार्थ्यांना bat, doll, cup, chat असे अनेक बोर्डावर जवळपास 50 शब्द लिहले होते. कोणताही शब्द विद्यार्थी अचूक अगदी बरोबर वाचन करत होते. मराठी जोडाक्षर शब्द वाचन करत होते. हा उपक्रम मला खूप आवडला. इयत्ता पहिली वर्गातील शैक्षणिक प्रगती पाहून मला खुपच आनंद झाला व श्री विवेक पवार सरांचे मनःपुर्वक अभिनंदन केले. विवेक पवार सरांचे कौतुकास्पद कार्य दिसून आले. शाळेतील वातावरण व शैक्षणिक प्रगती पाहून खुपच समाधान वाटले. अतिशय कमी कालावधीत गावातील नागरिकांच्या व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेत बाला उपक्रमांचे काम अतिशय सुंदर व दर्जेदार केल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश जी चव्हाण , शाळेतील शिक्षक श्री सतीश रितपुरे, श्रीकिरण स्वामी, सुर्यकांत बिरादार, कुमार सिंदाळकर,सहदेव खेडे, जनार्दन जाधव, विवेक पवार व शाळेतील शिक्षीका श्रीमती उर्मिला नाळापुरे, मालती मुळे, माकणीकर मॅडम आदी जणांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. एकंदरीत शाळेत भेट दिली  मला शाळा आवडली.या वेळी देवर्जन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेश जी चव्हाण, शाळेतील शिक्षक श्री सतीश रितपुरे, श्रीकिरण स्वामी, सुर्यकांत बिरादार, कुमार सिंदाळकर,सहदेव खेडे, जनार्दन जाधव, विवेक पवार व शाळेतील शिक्षीका श्रीमती उर्मिला नाळापुरे, मालती मुळे, माकणीकर मॅडम आदी जण उपस्थित होते.*