Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, February 12, 2022

तंबाखू मुक्त शाळेचे 9 निकष सविस्तर माहिती





🚭चला करूया आपलीही शाळा तंबाखूमुक्त🚭*
-----------------------------
*शाळा तंबाखूमुक्त करावयाचे खालील प्रमाणे निकष 👇* 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग भारत सरकार द्वारा तंबाखूमुक्त मुक्त शाळांसाठी खालील नवीन नऊ निकष पारित केले आहेत.याची पूर्तता करून फोटो TOBBACO FREE APPLICATION वर खालीलप्रमाणे अपलोड कराव्यात .
*🚭निकष १)* शैक्षणिक संस्थेच्या आवारात 'तंबाखूमुक्त परिसर' असा फलक असावा.त्यावर 1800-112-356 हा क्वीटलाईन नंबर नमूद केलेला असावा.
व्हरांड्यातील फलकाचा स्वतंत्र व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासोबत एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष २)* 'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' हा फलक शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर ,प्रवेशद्वाराजवळ असावा.त्यावर 1800-112-356 हा क्वीटलाईन नंबर नमूद केलेला असावा. 
फलकाचा स्वतंत्र फोटो व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचा समूह फोटो असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ३)* शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये. उदाहरणार्थ  सिगारेट बिडी चे तुकडे  किंवा गुटखा तंबाखू चे पाऊच व  भिंतीवर आतून व बाहेरून थुंकल्याचे डाग नसावेत असा भिंतीच्या कोपऱ्याचा फोटो घ्यावा.  यासाठी मुख्याध्यापकांनी घोषणापत्र द्यावे लागते. घोषणापत्रचा एक फोटो ,शाळेचा आतील दर्शनी भागाचा ज्यावर शाळेचे नाव असावे,वर्गाच्या कोपऱ्याचा व बाहेरील कोपऱ्याचा असे तीन फोटो एकत्र कोलाज करून अपलोड करावेत.
*🚭निकष ४)* शाळेतील विद्यार्थ्यांकडून तंबाखूच्या दुष्परिणामांचे,घातक रसायनांचे,COTPA 2003 व नऊ निकषांची माहिती असणारे पोस्टर तयार करून शाळेत चिटकवणे या सोबत शिक्षक व विद्यार्थ्यांचे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ५)* शैक्षणिक संस्थेत गेल्या सहा महिन्यात किमान एक तंबाखू मुक्त नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवणे,जसे रांगोळी स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी,  मुखतपासणी ,सत्कार समारंभ ,तंबाखू मुक्तीची शपथ यापैकी एका उपक्रमाचा फोटो ज्यामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम / तंबाखूविरोधी कार्यक्रम असा उल्लेख असावा.त्याचे दोन फोटो फलकासह असावा.
*🚭निकष ६)* शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू मॉनिटर्स म्हणून कर्मचाऱ्यामधून शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी नेमले पाहिजेत. साईन बोर्डवर,चार्ट पेपरवर अथवा बॅनरवर  तंबाखू  मोनिटर्सचे नाव हुद्दा आणि फोन नंबर देखील नमूद केली पाहिजे.फलकाचा स्वतंत्र व मोनिटर्ससोबत मुख्याध्यापक व शिक्षक यांचा एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ७)* शालेय परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, सेवन करणे, विक्री करणे आणि जाहिरात करणे यावर बंदी असून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुख्याध्यापक/वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात येईल याबाबतची सुचना/नोटीस मुख्याध्यापकांनी काढावी.नोटिसचा  एक फोटो व नोटीस सुचना फलकावर लावून मुख्याध्यापक यांच्यासह एक असे दोन फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ८)* शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसर पिवळ्या रंगाचे ( Yellow line ) रेखांकित करून तेथे 'तंबाखूमुक्त क्षेत्र' असे नाव लिहून त्याचा विद्यार्थी शिक्षक यांचा शाळेच्या फलकासोबत फोटो घ्यावा.शक्य नसल्यास मैलाच्या दगडावर "तंबाखू प्रतिबंधित क्षेत्र" असा उल्लेख करून तो 100 यार्ड अंतरावर लावून त्यासोबत फोटो काढून फोटो अपलोड करावेत.
*🚭निकष ९)* तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतीही दुकान शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डात नाही याबाबतचे मुख्याध्यापकाचे घोषणापत्र व शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो. जर एखादे दुकान असेल तर स्थानिक अधिकारी,सरपंच,तहसीलदार,आरोग्य अधिकारी,पोलीस यांना या पत्राद्वारे कळवावे. घोषणापत्राचा एक व रस्त्यावरील दर्शनी भागाचा पूर्ण संरक्षण भिंतीसह एक असे दोन फोटो अपलोड करावेत.जमत नसल्यास कोलाज करावेत.
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
         वरील सर्व निकष पूर्ण झाल्याची खात्री करून सलाम मुंबई फाऊंडेशन च्या 'टोबॅको फ्री स्कूल' या ॲप्लिकेशनवर सर्व पुराव्यांचे फोटो अपलोड करावेत त्याची सलाम मुंबई फाऊंडेशन कडून सर्व निकष पूर्ण झाल्याची खात्री करूनच शाळेला दोन वर्षांसाठी "तंबाखूमुक्त शाळा" असे प्रमाणपत्र दिले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖

तंबाखू मुक्त शाळा ही माहिती Tobacco free school या app मध्ये कशी करायची याविषयी माहिती पट व्हिडीओ
⬇️⬇️


No comments:

Post a Comment