" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

कृती संशोधन आराखडा



वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता येत नाही. कृतिसंशोधन सदर करण्यापुर्वी आपणास कृतिसंशोधन आराखडा सादर करावा लागतो. .

कृतिसंशोधन आराखडा नमुना संशोधन- 
कृतिसंशोधन आराखडा नमुना संशोधन  कृतिसंशोधन आराखडा नमुना संशोधन आराखड्यात पुढील मुद्द्यांचा समावेश असावा. मुखपृष्ठ मुखपृष्ठावर संशोधन समस्येचे शीर्षक, कोणाला सादर करणार आहात त्या संस्थेचे नाव, संशोधकाचे नाव, मार्गदर्शकाचे नाव. याप्रमाणे सर्व बाबी तयार केल्यानंतर आपण रृती संसोधन लिहण्यास सुरवात करावयाची असते.

१) प्रास्ताविक : संशोधनासाठी हा विषय का निवडला त्याची पार्श्वभूमी व गरज यासंबंधी थोडक्यात माहिती लिहावी.

२) शीर्षक:  आपण निवड केलेल्या समस्येचे नाव लिहावे.

३) संशोधनाची उद्दिष्टे:-  संशोधन समस्येची विविध भागात विभागणी करून त्यानुसार उद्दिष्टे निश्चित करावीत. उदा. तालुक्यातील इयत्ता आठवी च्या विदयार्थ्यांच्या गणित विषयातील मूलभूत क्रिया करताना होणाऱ्या चुकांचे निदान व उपाय या शीर्षकाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असू शकतात.

कृतिसंशोधन लेखन कसे करावे? 
१) मूलभूत क्रिया करताना विद्यार्थ्याच्या होणाऱ्या चुकांचा नैदानिक कसोटीद्वारे शोध घेणे.

२) शोधलेल्या चुकांवर आधारीत उपचारात्मक कार्यक्रम तयार करून त्याची परिणामकारकता उत्तर कसोटीद्वारे शोधणे.


३) प्राप्त निष्कर्षा आधारे संबंधितांना सूचना व शिफारशी करणे. उद्दिष्टांमुळे संशोधनाच्या जगू चतुःसीमाच निश्चित केल्या जातात. उद्दिष्टे निश्चित केल्यामुळे संशोधनाची दिशा चुकत नाही. 


४) गृहीतके संशोधन करताना काही गोष्टी, परिस्थिती, घटक गृहीत धरलेले असतात. काही तथ्य किंवा सिद्धांत असतात ते आहे तसे स्वीकारले जातात.

५) परिकल्पना संशोधकाने संशोधनाचा अपेक्षित केलेल्या निष्कर्षाचा संभाव्य अंदाज, संभाव्य म्हणजे परिकल्पना होय. परिकल्पना हे समस्येचे निराकरण करण्यासाठी पूर्वानुमान, अभ्यास व तर्क यावर आधारित असलेले विधान असते. परिकल्पना मांडताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, परिकल्पना म्हणजे स्वैरकल्पना नव्हे. परिकल्पनेला वास्तवाचा आधार असतो. परिकल्पना ज्ञान व माहितीच्या चौकटीत बद्ध असते.

६) संशोधनाची गरज व महत्त्व समस्या निवडीची गरज का पडली ? हीच समस्या का निवडली ? या समस्येची सोडवणूक केल्यावर कोणाला उपयोग होणार आहे यासंबंधीची माहिती येथे लिहावी.

७) महत्त्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या संशोधनामध्ये एखादया संज्ञेचा सर्वसामान्य अर्थ न घेता त्याचा संशोधनासाठी विशिष्ट मर्यादित असा अर्थ घेतला जातो. अशा शब्दांचा संशोधकाला कोणता अर्थ अपेक्षित आहे हे येथे स्पष्ट करावे.

८) संशोधनाची व्याप्ती व मर्यादा : आपले संशोधन कोणत्या विभागाशी संबंधित आहे, आपण त्यात कोणत्या बाबींचा समावेश करणार आहात व कोणत्या बाबींचा समावेश करता येणार नाही याची माहिती यात लिहावी. 


९) संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा संशोधन समस्येशी संबंधित साहित्य व काही पूर्वी झालेल्या संशोधनाचा आढावा देण्यात यावा.


१०) संशोधन कार्यपद्धती यात संशोधनाच्या प्रमुख तीन पद्धती आहेत. (ऐतिहासिक, सर्वेक्षणात्मक व प्रायोगिक) त्यापैकी कोणती पद्धत वापरणार आहात याची माहिती दयावी तसेच संशोधन करताना अनेक साधनांच्या साहाय्याने माहिती गोळा केली जाते. (उदा. प्रश्नावली, मुलाखत इत्यादी) त्यापैकी कोणत्या साधनांचा वापर आपण करणार त्याची माहिती दयावी. आपला न्यादर्श (नमुना) कोणता हेही येथे नोंदवावे आणि समस्या निश्चितीपासून आपण कोणत्या क्रमाने काय कृती करणार हे संशोधन कार्यपद्धतीत लिहावे.

११) कालावधी : संशोधन प्रक्रिया समस्ये निवडीपासून सुरू होते तर संशोधन अहवाल टंकलिखित करून सादर करेपर्यंतच्या कालावधीचे नियोजन देण्यात यावे.

No comments:

Post a Comment

विद्यार्थांच्या नावात, आडनाव, जात दुरुस्ती करणे बाबत प्रस्ताव

विद्यार्थांच्या नावात, आडनाव, जात दुरुस्ती करणे बाबत प्रस्ताव  Download here to click  👇 https://drive.google.com/file/d/14SQgSOH9Axhnt2xJC...