Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, June 26, 2022

राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतीय समाज सुधारक व सामाजिक लोकशाही चे आधारस्तंभ



*राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतीय समाज सुधारक व सामाजिक लोकशाही चे आधारस्तंभ*

आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात खुप मोठे कार्य केले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक शाळा शाळा सुरू केल्या. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पुरोहित शाळा, युवराज/ सरदार शाळा, पाटील शाळा, उद्योग शाळा, संस्कृत शाळा, सत्यशोधक शाळा, सैनिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शाळा, कला शाळा. अशा विविध शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖








No comments:

Post a Comment