Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, September 6, 2022

विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका : सौ.आशा काळे


*विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका : सौ.आशा काळे*
-----------------------------
   शिक्षण क्षेत्रातही महिला आता मागे राहिल्या नाहीत.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ.आशा काळे यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख शिक्षकदिनानिमित्त...
      सौ.आशा सूर्यकांत काळे (बडगे) यांचा   जन्म दि.१६ एप्रिल १९७८ रोजी उदगीर येथे एका सामान्य कुटुंबात झाला.त्यांचे वडील सूर्यकांतराव काळे हे भूविकास बँकेत सेवेत होते.त्यामुळे आशा काळे यांना शिक्षणासाठी कुठलीही अडचण भासली नाही.त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण संग्राम स्मारक विद्यालय उदगीर, अध्यापन पदविका शांतिनिकेतन अध्यापक विद्यालय उदगीर येथे प्राप्त केली.त्यानंतर दि.१ ऑगस्ट १९९८ रोजी वडमुरंबी ता.देवणी येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेवर शिक्षिका म्हणून प्रथम रुजू झाल्या.त्यानंतर स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सेवांतर्गत बी.ए.ची पदवी प्राप्त केली.तसेच संगणक, टाईपरायटिंगचे शिक्षण घेतले.वडमुरंबी ता.देवणी येथे त्यांनी ७ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर त्यानंतर २००५ ते २०१३ या काळात जि.प.प्रा.शाळा बामणी येथे आठ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर २०१३ पासून 2018 पर्यंत जि.प.प्रा.शाळा वाढवणा(खु.) येथे सेवा बजावली .त्यानंतर 2018 पासून आजतागायत शेल्हाळ जि.प.प्रा.शाळेत शिक्षिका म्हणून सेवेत आहेत.
   सौ.आशा काळे ( बडगे ) यांनी आपल्या २४ वर्षाच्या सेवा काळात  विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून  त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या शाळेवर सेवा बजावताना त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले.प्रत्येक शाळेवर सेवा बजावताना त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले. प्रत्येक शाळेवर आयोजित उपक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.आदर्श परिपाठ, शाळा सजावट, वर्ग सजावट,स्पर्धा परीक्षेच्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासिका, वृक्षारोपण अशा कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला.वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विदयार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व, अशा स्पर्धेत सहभागी केले.त्यांची पूर्ण तयारी करून घेण्याचे कामही त्यांनी केले.निसर्ग शाळा, चावडी वाचन,  महिला मेळावा किशोरी मेळावा, माता पालक गट मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.शाळेच्या वतीने आयोजित वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थी तयार करण्याचे कामही त्यांनी केले.विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, रांगोळी, चित्रकला स्पर्धेसाठी तयारी पूर्ण करून घेवून विद्यार्थी परिपूर्ण बनविले. शाळेत आयोजीत महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी वेशभूषेत सादरीकरण, भाषण यासाठी तयारी करून घेतली.शाळेत आयोजीत विविध स्पर्धा, पालक मेळावा, या कार्यक्रमात सौ.आशा काळे (बडगे )मॅडमचा सहभाग महत्वाचा असतो.त्यांनी प्लस पोलिओ, जनगणना,  निवडणूक, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर सारख्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
    आपण कार्य करीत राहिलो की, आपली कोणी ना कोणी नोंद घेतच असते.त्याप्रमाणे सौ.आशा काळे मॅडमच्या एकूणच शैक्षणिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक संस्थांनी सन्मानीत केले. पुणे येथील काव्य मित्र संस्था च्या वतीने राष्ट्रीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,२०१६ चा पंचायत समिती उदगीर चा आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रत्येक शाळेवर ग्रामस्थांच्या वतीने  त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, समाजाच्या वतीने  २०१२ व २०१६ मध्ये त्यांना गोंधळी समाज भूषण पुरस्कार मिळाला, जिल्हा प्राथमिक संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.आशा काळे मॅडमनी घडविलेले विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. सौ.आशा काळे मॅडमच्या आई मनोरमा सूर्यकांत काळे हया गृहिणी आहेत.भाऊ आनंद सूर्यकांत काळे हे उदगीर अर्बन बँक शाखा लातूर येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सौ.आशा काळे मॅडम ह्यांनी विद्यार्थी घडवीत असताना आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण दिले. त्यांचा मुलगा यशोदीप हा बारामती येथील कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतोय.तर मुलगी वैष्णवी ही बारावी वर्गात शिक्षण घेत आहेत.त्यांचे पती श्री.ज्ञानेश्वर बडगे हे जि.प.प्रा.शाळा तिवटग्याळ ता.उदगीर येथे मुख्याध्यापक आहेत.ते मॅडमच्या प्रत्येक कार्यात सहकार्य प्रोत्साहन देत असतात.जीवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानणाऱ्या सौ.आशा काळे मॅडम याना भविष्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे.गोरगरीब, होतकरू मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे.आज शिक्षक दिना निमित्ताने त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवूया !

   *शंकर बोईनवाड*

No comments:

Post a Comment