Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, October 15, 2022

तिवटग्याळ येथे वाचन प्रेरणा दिन, जागतिक हातधुवा दिन राबविण्यात आला

तिवटग्याळ येथे वाचन प्रेरणा दिन, जागतिक हातधुवा दिन राबविण्यात आला           

*तिवटग्याळ - आज दिनांक 15/10/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे मोठ्या उत्साहात शालेय परिपाठा नंतर प्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,डॉ हावण्णा तसेच शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार,आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, आरोग्य सहाय्यक जाधव सर व सिस्टर तोवर मॅडम मुळे यांनी केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक  श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, पुजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी मार्गदर्शन केले . तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक वाचण्यास दिले. शाळेत पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  तसेच जागतिक हातधुवा दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्च्छता, वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याच्या सहा पायरी प्रात्यक्षिक आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे करून प्रात्यक्षिक सांगितले व सविस्तर माहिती देऊन हा  हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, डॉ. हावण्णा, आरोग्य सहाय्यक जाधव, सिस्टर तोवर मॅडम, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*



























































No comments:

Post a Comment