Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, November 6, 2022

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार सविस्तर उदाहरणासह माहिती




शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दाला जोडून येणारे अव्यय. उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे . यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत.

           'काम'शब्दाला 'मुळें' लागण्यापूर्वो 'काम'.चे 'कामा' हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें.

आणखी उदाहरणें :-

          सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.

शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सामान्य रूप ), खालीं ( शब्दयोगी अव्यय )

आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या (सारू),जवळ (श.अ.)

     शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.

                  शब्दयोगी अव्यय हें अ-व्यय असल्याने त्यामध्यें लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होतें.



शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार आहेत.  -


कालवाचक – आधीं, नंतर, पर्यंत, पावेंतों, पुढें, पूर्वीं

गतिवाचक - आंतून, खालून, पर्यंत, पासून, मधून

स्थलवाचक – अलीकडे, आत, जवळ, ठायीं, नजीक, पाशींपुढें, बाहेर, मध्यें, मागें, समोर

करणवाचक – कडून, करवीं,करून, द्वारां, मुळे, योगे, हातीं

हेतुवाचक – अथा, करिता, कारणें, निमित्त, प्रीत्यर्थ, साठीं, स्तव

व्यक्तिरेखा वाचक – खेरीज, परतां, वाचून, विना, व्यक्तिरिक्त, शिवाय

तुलनावाचक – तम, तर, परीस, पेक्षा, मध्ये

योग्यतावाचक – प्रमाणें, बरहुकूम, सम, समान, सारखा, योग्य

कैवल्यवाचक – केवळ, ना, पण, फक्त, मात्र

संग्रहवाचक – केवळ, देखील, पण, फक्त, बारीक, सुद्धा, ही

संबंधवाचक – विशीं, विषयीं

साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगें, सकट, सहित, सवें, निशी, समवेत

भागवाचक – आतून, पैकीं, पोटीं

विनिमयवाचक – ऐवजी, जागी, बदली, बद्दल

दिकवाचक – कडे, प्रत, प्रति, लागी

विरोधावाचक – उलटविरुद्ध, वीण

परिणाम वाचक – भर

No comments:

Post a Comment