Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 30, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी*


*तिवटग्याळ . - आज  दिनांक 30/1/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे  महात्मा गांधी यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील अन्य नागरिक यांनी महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर थोर महात्मा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शाळेत ठीक 11. 00 वाजता दोन मिनिट स्तब्धता ( मौन )पाळून बापूजीच्या चरणी विनम्र अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व नागरीकांना आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दिवस असल्याने आपण आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहे असे सांगितले व  आज हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती  दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे ,शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस, भागाबाई बिरादार, उपाध्यक्ष कैलास तवर व  शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*




















Sunday, January 29, 2023

शिक्षक व पदवीधर मतदार संघ search Voter list


*शिक्षक व पदवीधर मतदार संघ*

*नाशिक पदवीधर व कोकण, अमरावती,  नागपूर व औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात ज्यांनी नाव नोंदणी केली आहे त्यांना आपले नाव चेक करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली असून खालील लिंक ला क्लिक करून आपले नाव पहा👇*

Saturday, January 28, 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार यांना मतदान कसे करायचे जेणे करून आपले मतदान वैध ठरेल या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार यांना मतदान कसे करायचे जेणे करून आपले मतदान वैध ठरेल या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ👇

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार यांना मतदान कसे करायचे जेणे करून आपले मतदान वैध ठरेल या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार यांना मतदान कसे करायचे जेणे करून आपले मतदान वैध ठरेल या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ👇

इयत्ता बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 हाॅलटिकेट लिंक


*🔥12वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आले.*

*🔥शाळेशी संपर्क करा. हॉल तिकीटवर दुरुस्ती असल्यास लगेच सांगा*

*इयत्ता बारावी 21 फेब्रुवारी 2023 Hall Ticket login link 👇* 

---------------------------
*HSC वेळापत्रक👇* 


*HSC vocational वेळापत्रक👇* 



*SSC वेळापत्रक👇* 


*🔥12वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आले.*

*🔥शाळेशी संपर्क करा. हॉल तिकीटवर दुरुस्ती असल्यास लगेच सांगा*

*इयत्ता बारावी 21 फेब्रुवारी 2023 Hall Ticket login link 👇* 

---------------------------
*HSC वेळापत्रक👇* 


मै भारत हू, हम भारत के मतदाता है हे नवीन गीत निवडणूक आयोगाने मतदान जनजागृती साठी लॉन्च केले आहे



मै भारत हू, हम भारत के मतदाता है
हे नवीन गीत निवडणूक आयोगाने मतदान जनजागृती साठी लॉन्च केले 
⬇️⬇️

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक सुर्य नमस्कार दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक सुर्य नमस्कार दिन उत्साहाने साजरा*

*तिवटग्याळ - आज दिनांक 28/1/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शालेय परीपाठानंतर शाळेतील सर्व विद्यार्थाना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यांनी सांगितले की आज मराठी महिन्यातील माघ महिन्याच्या रथसप्तमी या दिवशी जागतिक सुर्य नमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले तसेच सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन घेऊन विद्यार्थ्यांना सुर्य नमस्कार प्रात्यक्षिक घेऊन हा दिन साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सुर्य नमस्कार दिन व दिनाचे महत्त्व सांगितले. "जागतिक सूर्यनमस्कार दिन" हा सूर्यनमस्काराच्या सरावाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात साजरा केला जाणारा एक दिवस आहे, जो योग आसनांचा एक क्रम आहे ज्यामध्ये सूर्याला आदर देणे समाविष्ट आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिन हा दिवस सामान्यतः मोठ्या सार्वजनिक मेळाव्याद्वारे चिन्हांकित केला जातो जेथे लोक एकत्रितपणे सूर्यनमस्कार करण्यासाठी एकत्र येतात. हा दिवस दरवर्षी हिंदू महिन्याच्या माघ महिन्याच्या पहिल्या रविवारी (जानेवारी - फेब्रुवारी) साजरा केला जातो. जागतीक सूर्यनमस्कार दिन  हा सूर्यनमस्काराच्या सरावाला समर्पित एक दिवस आहे, 12 योग आसनांची मालिका आहे जी सूर्याच्या उपासनेचा एक प्रकार म्हणून क्रमाने केली जाते. हा दिवस भारत आणि नेपाळच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो. सूर्यनमस्काराच्या सरावाने लवचिकता, शक्ती आणि एकाग्रता वाढण्यासह अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे असल्याचे सांगितले जाते. तद्नंतर शाळेतील योग शिक्षीका अंजली लोहारकर यांनी सुर्य नमस्काराचे एकुण बारा आसने प्रात्यक्षिक करून दाखवले व सुर्याची नावे स्तोत्रातुन विद्यार्थ्यांना म्हणून दाखवले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*