*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी*
*तिवटग्याळ . - आज दिनांक 30/1/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, उपाध्यक्ष कैलास तवर व गावातील अन्य नागरिक यांनी महात्मा गांधी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर थोर महात्मा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शाळेत ठीक 11. 00 वाजता दोन मिनिट स्तब्धता ( मौन )पाळून बापूजीच्या चरणी विनम्र अभिवादन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व नागरीकांना आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी दिवस असल्याने आपण आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहे असे सांगितले व आज हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे ,शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस, भागाबाई बिरादार, उपाध्यक्ष कैलास तवर व शाळेतील विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*
No comments:
Post a Comment