Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, November 14, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणुन साजरी

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणुन साजरी

तिवटग्याळ - दिनांक 14/11/2022 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता उदगीर. जिल्हा लातूर येथे मोठ्या उत्साहाने    पंडीत जवाहरलाल नेहरू  यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व BRC उदगीर चे साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व  आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे, इंजिनिअर फटाळे सर व विद्यार्थी उपस्थित होते.





































No comments:

Post a Comment