Friday, January 25, 2019
रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदर्श मातांचा सत्कार. उदगीर वार्ता........ रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 24/1/2019 रोजी महीला मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सदस्यां सौ.सुनिता गोंदेगावे,व प्रमुख पाहुणे सौ.तस्लीमबी पटेल, शोभा कोयले, श्रीमती सुरेखा जाधव, आदी जण उपस्थित होते.प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात महीला मेळावा, आदर्श मातांचा सत्कार व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे सांगितले. मूख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सांगितली. तसेच या महीला मेळाव्यातील विषयावर सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी महीला मेळाव्यात उपस्थित सर्व महिलांना बालसंगोपन, शिक्षणाची गरज व आवश्यकता, स्त्रि पुरुष समानता. महिला सक्षमीकरण, नैतिक मूल्ये, संस्कार, आई म्हणून पालकांची जबाबदारी, कौंटुबिक नातेसंबंध व जिव्हाळा,कालची व आजची स्त्रि, कुटुंब पद्धती या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच पंचायत समिती सदस्या सौ सुनिता गोंदेगावे यांनी उपस्थित सर्व महिलांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले, महीला सक्षमीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच मूलांना चांगले संस्कार द्यावे असे सांगितले. तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी वर्गातील हुशार मुलगा व मुलगी यांच्या आई चा आदर्श मातां म्हणुन सत्कार करण्यात येणार आहे असे सांगितले व खालील मातांचा सत्कार करण्यात आला या मध्ये सौ. अश्विनी गायकवाड,सौ.आसमा पटेल,सौ.अयोथ्या गायकवाड,सौ.सुनंदा गायकवाड.सौ.तस्मीमबी पटेल.सौ. अर्चना गायकवाड,सौ.चांदबी सय्यद,सौ.नसरीन सय्यद,सौ.नजमा शेख.सौ.आयेशा सय्यद, श्रीमती कविता कांबळे,सौ.शाहीन शेख,सौ.यासीन सय्यद,सौ.जहीराबी शेख,सौ.जैतुनबी सय्यद,सौ.रेश्मा शेख,सौ.रहिमा सय्यद,सौ.नसरीन सय्यद,सौ.मालन मनियार,सौ.वजीरबी सय्यद,सौ.वहीदाबी शेख,सौ.तैसिन सय्यद,सौ.शमा मुरशेद,सौ.सोनाली सुर्यवंशी आदी मातांचा आदर्श मातां म्हणुन सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांती विषयावर सविस्तर माहिती दिली व तिळगुळ व वाण वहि व पेन देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या महीला मेळाव्याचे सुत्रसंचलन शिक्षीका सुनिता पोलावार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment