Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, January 25, 2019

रावणगावात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा. उदगीर वार्ता..........रावणगाव ता.उदगीर येथे भाग क्रमांक 311 चे केंद्र स्तरीय मतदान अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे, गावाचे प्रथम नागरिक मा.सरपंच प्रल्हादराव सुर्यवंशी, मष्णाजी गायकवाड व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत दिनांक 25/1/2019 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व नागरीक यांना घेऊन गावात विविध घोषवाक्य म्हणण प्रभातफेरी काढण्यात आली.मतदार राजा जागा हो, लोकशाही चा धागा हो.मतदान हमारा अधिकार है‌.जो विकास के काम करेंगे। वोट उन्हों को नाम करेंगे। वोट डालने जाना है। अपना फर्ज निभाना है। लोकतंत्र का भाग्य विधाता। होता जागरूक मतदाता। लोकतंत्र का यह आधार। वोट न कोई हो बेकार। छोडो अपने सारे काम। पहले चलो करें मतदान। वोट करें वफादारी से ‌। चयन करें समझदारी से। बुढा हो या जवान। सभी करें मतदान.या घोषणा दिल्या.तसेच रॅली नंतर उपस्थित सर्व मतदारांना मतदारांची सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. मतदारांसाठी प्रतिज्ञा आम्ही भारताचे नागरिक ‌लोकशाहीवर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखु व प्रत्येक निवडणुकीत निर्भय पणे तसेच धर्म,वंश,जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभणास बळी न पडता मतदान करू. या नंतर उपस्थित सर्वांचे केंद्र स्तरीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी आभार मानले. या वेळी शाळेतील विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment