Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, August 21, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी सणा निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी सणा निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर.*

*तिवटग्याळ .....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 21/8/2023 रोजी मोठ्या उत्साहात नागपंचमी  निमित्त  शाळेत शैक्षणिक भुलई   जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व मुलींनी ना साडी हा  पोशाख परिधान करून शाळेत  नागपंचमी या सणा निमित्ताने यावे असे सांगितले. तद्नंतर नागपंचमी सणांवर आधारित शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी नागपंचमी या सणा विषयी सविस्तर माहिती दिली. हा श्रावण महिन्यातील सण आहे.या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते. शालेय गीते, बडबड गीते, कविता,  भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी अतिशय सुंदर विविध शालेय गीते, कविता, बडबड गीते, गवळण व अन्य नागपंचमी सणाच्या निमित्ताने कला फुगडी, झिम्मा आदी उपक्रम घेतले. विद्यार्थ्याना अतिशय आनंददायी पध्दतीने कला गुणांचा वाव देऊन नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते*





































































No comments:

Post a Comment