Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 18, 2021

थोडेसे माय-बापासाठी पण....... या उपक्रमांतर्गत तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे 60 वर्षावरील व्यक्तींचे आरोग्य शिबीर आयोजित

*थोडेसे माय बापासाठी पण..........* 

*या उपक्रमांतर्गत तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 60 वर्षावरील व्यक्तींचे आरोग्य तपासणी मोहीम आयोजित*

                   जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 17/9/2021 रोजी थोडेसे माय-बापासाठी पण.... या उपक्रमांतर्गत 60 वर्षावरील व्यक्तींचे B. P., sugar, blood तपासणी मोहीम आयोजित करून 60  ते पुढील वर्षीपर्यंत तिवटग्याळ गावातील महिला व पुरुष जेष्ठांना शाळेत बोलावून B. P., Sugar, blood तपासणी केली. यावेळी डॉ. अंंतेश्वर हावण्णा, आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती येलमटे एस. पी., श्री खटके परमेश्वर. आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, ग्राम पंचायत चे सेवक प्रविण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर आदी जण यांनी  उपस्थित होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना social distance, sanitizer,, Handwash  व mask याचा अनिवार्य वापर करावा असे सांगितले व या आरोग्य अधिकारी टिम ला सहकार्य केले. गावातील 60 वर्षावरी जेष्ठांना B. P., sugar, blood तपासून घेण्यासाठी  जन जाग्रती केली. कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पात्र नागरीकांनी तपासणी मोहीमेत सहभाग घेतला. उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले




















No comments:

Post a Comment