Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, November 4, 2022

तुलसी विवाह आणि तुलशी विवाह मुहूर्त सविस्तर माहिती

तुलसी विवाह आणि मुहूर्तावर सविस्तर माहिती 








*श्रीशनिवार , दिनांक ०५ नोव्हेंबर २०२२ ( कार्तिक शुद्ध-१२,अर्थात शु.द्वादशी ) या दिवशी तुलसी विवाह आरंभ होत आहे .* 

*मंगळवार , दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ ( कार्तिक शुद्ध-१५,अर्थात पौर्णिमा ) या दिवशी तुलसी विवाह समाप्ती आहे .* 

*दिनांक 08 नोव्हेंबर 2022 मंगळवार रोजी खग्रास चंद्रग्रहण सुध्दा आहे .*
 
सायंकाळी
 ०६:१९ वाजता ग्रहण मोक्ष आहे . ग्रहण मोक्ष झाल्यावर स्नान करून नंतर तुलसी विवाह करता येईल . तुलसी विवाह सायंकाळी ०७ वाजे नंतर करावा.

*मात्र दिनांक ०५नोव्हेंबर शनिवार,०६नोव्हेंबर रविवार, किंवा ०७नोव्हेंबर सोमवार यांपैकी एका दिवशी तुलसी विवाह करणे अधिक योग्य होईल .*  

            *(साभार दाते पंचांग)*
                     
            *-अशोक कुळकर्णी, जळगाव.*
                     *मो.८२३७३२०१८२*
➖➖➖➖➖➖➖➖➖

*तुलसी विवाह विषयी सविस्तर माहिती*

           तुलसी विवाह म्हणजे तुळशी या वनस्पतीच्या रूपाशी शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजात्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते

विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात. पण मुख्यतः द्वादशीला तुलसी विवाह करतात. तुळशी विवाह एक व्रत मानले गेले आहे. 

तुलसी विवाह पौराणिक कथा

          तुळशी पूर्वजन्मी ती एक मुलगी होती. तिचे नाव वृंदा होते. ती राक्षसांच्या कुळात जन्मलेली होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची पूजा करत असे. जेव्हा ती मोठी झाली तिचा विवाह राक्षस कुलातील जलंधर नावाच्या एका राक्षसाशी झाला. जलंधरची उत्पत्ती ही समुद्रातून झाली होती.

         वृंदा ही आपल्या पतीशी अतिशय समर्पित होती. ती नेहमी आपल्या पतीची सेवा करत असे. असेच एकदा देव दानव यांच्यात युद्ध सुरू झाले. जेव्हा जलंदर युद्ध करायला निघाला तेव्हा वृंदा म्हणाली 'स्वामी जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही. असे वचन मी तुम्हाला देते.'


            वृंदाचे हे बोल ऐकून जलंदर युद्धास निश्चिंत होऊन गेला. वृंदाच्या उपासनेमुळे जलंधर युद्ध जिंकू लागला. वृंदाच्या उपासनेमुळे देव विजय होत नसल्याने ते विष्णूकडे आले. व विष्णूकडे यावर उपाय काढण्यासाठी याचना करू लागले.


         तेव्हा भगवान विष्णू म्हणाले 'वृंदा ही माझी परमभक्त आहे. आणि मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही.' तेव्हा देवही म्हणाले की 'आम्हाला तुमच्याशिवाय कोण मदत करणार? तुम्ही या संकटातून आम्हाला वाचवा.'

            विष्णूंनी देवतांची याचना मान्य करून भगवान विष्णू जलंधरचे रूप घेऊन वृंदाच्या राजवाड्यात आले. आनंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली. ती ताबडतोब पूजे वरून उठली आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. जसा वृंदाचा संकल्प सुटला. देवतांनी जलंधरला ठार मारले. आणि जलंदरचे ते कापलेले डोके राजवाड्यात घेऊन आले. तेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे. तेव्हा तिच्या लक्षात आले की आपल्या समोर कोणती दुसरीच व्यक्ती आहे.


वृंदाने विचारले 'तू कोण आहेस? ज्याला मी स्पर्श केला.' मग श्रीविष्णू त्यांच्या मूळ रूपात आले. वृंदाच्या सर्व काही लक्षात आले. वृंदाने श्री विष्णूंना शाप दिला. आणि पाहताक्षणी श्री विष्णूंचे पाषाणात रूपांतर झाले.

सर्व देवी देवता रडू लागले. तसेच लक्ष्मी रडून प्रार्थना करू लागल्या ते पाहून वृंदा ने श्रीविष्णूंना शापातून मुक्त करून आपल्या पतीसोबत सती गेली.

         काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती उगवली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले 'आजपासून या वनस्पतीचे नाव तुळशी असून माझ्या पाषाणरुपी स्वरूपाचे म्हणजे शाळीग्राम चे तुळशीसह पूजन केले जावे. तुळशी शिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही.


तेव्हापासून सर्वजण तुळशीची पूजा करू लागले. आणि कार्तिक महिन्यात तुळशीचे शालिग्राम म्हणजेच श्रीविष्णूंच्या पाषाण रूपाशी लग्न लावायची प्रथा पडली. देव- उत्थानी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment