*जिल्हांतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह सुधारित विश्लेषण व सविस्तर माहिती👇*
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह सुधारित विश्लेषण
दि 31 डिसेंबर 2022 पर्यंत संभाव्य रिक्त पदे बदलीसाठी गृहीत धरणार
(ही पोस्ट बदली शासन आदेश 7 एप्रिल 2021 , बदली वेळापत्रक 21 ऑक्टोंबर 2022 , Vinsys कंपनीने दिलेली उत्तरे व VC 31 ऑक्टोंबर 2022 यांचे आधारे तयार केलेली आहे.)
✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले असून. सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षकांकरिता लॉगिन सुरू होईल.
➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे.👇
https://ott.mahardd.in/
बदली पोर्टल वर लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा.
✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा.
जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल.
➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल.
➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल.
➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा अन्यथा आपण आहे त्या ठिकाणी सोयीने असल्यास व आपण बदली पात्र नसल्यास कोणताही तपशील नोंदवण्याची गरज नाही परंतु तशी सोय पोर्टलवर असल्यास शहानिशा करावी.
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग 10 वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंतीक्रम न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नकार देण्याची सुविधा असल्यास नकार नोंदवावा.
✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील प्रमाणे होकार दर्शविल्यास वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवावा.
➡️ या शिक्षकांना आपल्या पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार प्राधान्यक्रम राहील.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्याच जागा मागता येतील.(शासन निर्णय व VC नुसार)
✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.
➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांची बदली होणार नाही त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील. (Vinsys मार्गदर्शनानुसार)
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना त्यांच्या व्याख्येमधील क्रमवारीनुसार प्राधान्यक्रम लागू राहील.
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी.
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग 10 वर्षापेक्षा कमी असेल व दोघेही बदली पात्र नसतील व बदली नको असल्यास नकार देण्याची गरज नाही कोणताही तपशील न नोंदवणे म्हणजेच नकार समजल्या जातो तरीसुद्धा पोर्टलवर जाऊन शहानिशा करावी.
➡️ विशेष संवर्ग भाग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येतील.
✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा.
➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास व ते शिक्षक बदली पात्र शिक्षक नसल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.
➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांना बदली हवी असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील आणि बदली नको असल्यास आपला नकार ऑनलाईन नोंदवावा लागेल. (GR नूसार व Vinsys कंपनीच्या मार्गदर्शनावरून)
➡️ अन्यथा या शिक्षकांची बदली पात्र शिक्षक समजून रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा पसंतीक्रम देऊ शकतात.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या बदल्यांसाठी पात्र धरावयाच्या सेवाजेष्ठतेने करण्यात येतील.
➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.
✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)
➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व शाळेवर सलग 5 वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे.
➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल.
➡️ बदली पात्र शिक्षकांना निवळ रिक्त, बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या रिक्त व बदली पात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील.
✳️ विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल.
➡️ या शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या बदली टप्पा संपल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित रिक्त जागा (सामानीकरणाच्या रिक्त जागा सोडून) दाखवल्या जातील.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पहिल्यांदाच शाळांचा पसंतीक्रम देताना संवर्गनिहाय यादीतील प्राधान्यक्रमाचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत.
✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)
➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.
➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल.
➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल.
➡️ या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील समाणीकरणाच्या रिक्त ठेवायच्या जागा सोडून सर्वच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा दाखवल्या जातील.
✳️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)
➡️ बदली प्रक्रिया ही वेळापत्रकानुसार वेळेतच पूर्ण केली जाईल
-----------------------------
No comments:
Post a Comment