Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, November 16, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता- पालक गट अंतर्गत निपुण उत्सव साजरा


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता- पालक गट अंतर्गत निपुण उत्सव साजरा*

*तिवटग्याळ - आज दिनांक 15/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गट बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या माता - पालक गट व लिडर माता यांना पुर्व सुचना देऊन निपुण उत्सवासाठी बोलावण्यात आले. प्रथम गावच्या महिला सरपंच सौ उज्ज्वला ताई व लिडर माता सौ. स्मिता पाटील, गीता कच्छवे व मंदाकिनी पाटील, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्सवासाठी सुरुवात करण्यात आली. तद्नंतर या निपुण उत्सवासाठी प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवर सौ. उज्ज्वला ताई नरहरे सरपंच, गीता कच्छवे, जयदेवी बिरादार, पार्वती पाटील, जयश्री बिरादार, मिरा तोमर पाटील, स्मिता पाटील, आरती तवर, संगीता बिरादार, सत्यभामा साळुंके, रेश्मा कांबळे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती वर्षा श्रीमंगले व प्रभाकर पाटील आदी पुरुष व महीलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तद्नंतर या निपुण भारत अभियान ची सविस्तर माहिती प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितली. तसेच या निपुण उत्सवात शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांनी माता - पालक गटाची उध्दीटे, निकष, कार्य या विषयावर सविस्तर माहिती दिली. माता - पालक गटाला दर आठवड्याला एक Idea Video शैक्षणिक उपक्रम आपणांस दिला जाणार आहे तो उपक्रम आपल्या वार्डातील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे असे सांगितले व प्रत्यक्षात काही उपक्रम माता - पालक गट सदस्य व लिडर मातांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी दाखले. 1 ते 10 संख्याची ओळख, स्मरण शक्ती खेळ वेगवेगळ्या वस्तू टेबलावर मांडून दाखवणे व नंतर त्या वस्तू झाकून डोळे बंद करून क्रमाने सांगितले, टेबलावर व टेबलाखाली विविध वस्तूंची मांडणी करुन वस्तू टेबलावर आहेत की खाली पुर्ण वाक्यात सांगणे. अशा विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती देउन निपुण उत्सव साजरा केला. शासनाने दर आठवड्याला एक Idea Video देणार आहेत. आतापर्यंत नऊ Idea Video दिलेले आहेत ते लिडर मातांनी आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवून सविस्तर मार्गदर्शन करावे असे सांगितले. या निपुण महोत्सव कार्यमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. चहापानानंतर निपुण उत्सवासाठी सांगता करण्यात आली.  निपुण उत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी परीश्रम घेतले*













































































No comments:

Post a Comment