Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, January 1, 2023

आरोग्य टिप्स 1️⃣महिलांना पाठदुखी 2️⃣ऍलर्जी म्हणजे काय 3️⃣हिवाळ्यात डिंकाचे खाणे फायदा 4️⃣घरगूती तक्रारी आणि औषधे 5️⃣थंडीच्या दिवसात हे करावयला हवे 6️⃣टाचा भेगा 7️⃣मूळव्याध 8️⃣केस पांढरे 9️⃣हिरड्यांना सूज येणे




➖➖➖➖➖➖➖
आजच्या आरोग्य टीप्स
➖➖➖➖➖➖➖
1️⃣महिलांना पाठदुखी
2️⃣ऍलर्जी म्हणजे काय
3️⃣हिवाळ्यात डिंकाचे खाणे फायदा
4️⃣घरगूती तक्रारी आणि औषधे
5️⃣थंडीच्या दिवसात हे करावयला हवे
6️⃣टाचा भेगा
7️⃣मूळव्याध
8️⃣केस पांढरे
9️⃣हिरड्यांना सूज येणे



 *हिरडयांना सूज-पू येणे*
हिरडयांवर अनेक कारणांनी सूज येते.

-  तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे
-  'क' जीवनसत्त्व (पालेभाज्या, लिंबू, आवळा, संत्री) कमी पडल्यामुळे.
-  हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो.
-  मिश्रीची सवय असल्यासही हिरडयांना त्रास होऊ शकतो. गोड पदार्थ, जास्त शिजवलेले पदार्थ व पिठूळ पदार्थ, इत्यादींनी दातांच्या फटीमध्ये अन्नकण राहतात. यामुळे दात व हिरडयांचे रोग लवकर होतात.
-  कीटण चढले असल्यास, तोंडात दुर्गंधी येत असल्यास, हिरडयांतून पू व रक्त येत असल्यास दंतवैद्याकडून वेळीच उपचार करावे.
ब-याच जणांच्या दातांवर एक प्रकारचे कठीण पिवळे कीटण चढते. यामुळे हिरडया व दात यांमध्ये फट तयार होते. अन्नकण यात अडकून कुजतात व दुर्गंध येतो, कीटणामुळे हिरडयांची हानी होते. यामुळे दातांचा मुळाकडचा भाग उघडा पडत जातो. या सर्व घटनाक्रमामुळे हिरडयातून पू व रक्त येते. यामुळे हळूहळू दात दुबळे होऊन पडतात. दातांवर कीटण न चढेल इतकी स्वच्छता रोज पाळणे आवश्यक आहे. ब्रशचा वापर करताना हा उद्देश लक्षात ठेवावा. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.

उपचार

-  'क' जीवनसत्त्वाची गोळी रोज एक याप्रमाणे 5 दिवस द्यावी किंवा त्याऐवजी आवळा, लिंबू वगैरे 4-5 दिवस खाण्यात यावे.
-  मिठाच्या पाण्याने चुळा भरून तोंड स्वच्छ ठेवावे. झोपताना देखील चुळा भरून स्वच्छता ठेवावी.
-  चॉकलेट, गोळयांची सवय असलेल्या मुलांचे दात लवकर किडतात, त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवावे.
होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

दातांची व हिरडयांची स्वच्छता

-  दात घासण्यासाठी चांगला ब्रश आणि पेस्ट लागते.  ब्रशच्या केसांनी दातांच्या फटीतील घाण व अन्नकण निघू शकतात. ब्रश  आडवा धरून खालीवर फिरवणे आवश्यक आहे.
-  ब्रश नसल्यास दात घासण्यासाठी बाभूळ, कडूनिंब, वड, रूई यांचे दातवण चालेल. यांच्या करंगळीएवढया जाड अशा एक वीत लांबीच्या काडया दातवण म्हणून वापराव्यात. प्रथम काडीचा भाग चावून मऊ करावा. मग दातवणाच्या कुंचल्यासारख्या झालेल्या टोकाने दात स्वच्छ करावेत.
-  रात्री जेवणानंतरही दात ब्रश किंवा दातवणाने साफ करणे आवश्यक आहे.
-  प्रत्येक जेवणानंतर ताबडतोब खळखळून चूळ भरणे आवश्यक आहे.  बोटाने हिरडया चोळाव्यात. शक्यतो अर्ध्या तासाच्या आतच चूळ भरणे आवश्यक आहे.
-  दातावर कीटण चढू न देणे हे महत्त्वाचे आहे.
-  गोड पेस्टपेक्षा तुरट, कडू चवीच्या पेस्टने स्वच्छता चांगली होते.
-  टुथपेस्ट नसल्यास ब्रश व दंतमंजनाचा वापर करता येईल

*आजची आरोग्य टिप्स*


 *थंडीच्या दिवसात हे करायला हवे*

थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागते. केस, त्वचा कोरडी होते. अशा वेळी काही घरगुती उपचार करता येतात.

१) वाटीत खोबरेल तेल घेऊन ते गरम करावे. नंतर कापसाच्या बोळ्याने तेल संपूर्ण डोक्याला लावावे. हलक्या हाताने मॉलीश करावे. उथळ भांडयात पाणी गरम करून वाफ घ्यावी. गरम पाण्यात टॉवेल बुडवून घट्ट पिळून डोळ्यांभोवती गुंडाळावा व दहा मिनिटांनी पुन्हा मॉलीश करावे.
२) गाजर या दिवसात मुबलक मिळतात. त्याचा रस घेतल्याने डोळ्यांना उपयुक्त ठरते.
३) डोळ्यांभोवतालची त्वचा कोरडी पडली असल्यास बदामाचे तेल लावावे किंवा बदाम उगाळून लावावा.
४) साय किंवा तुप थोड़े कोमट करून थोड़े ओठांना लावावे.
५) दुधाच्या सायीमध्ये ग्लिसरीनचे काही थेंब व लिंबाचा किंचित रस घालून ते मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावावे.
६) ग्लीसरीन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस चमाचभर मिसळून हातापायाना लावावे. हातपाय स्वच्छ व मऊ राहतात.
७) हात साबण लावून धुतल्यावर लगेचच खोबरेल तेल लावावे. मऊ राहतात.
हे उपचार करण्याबरोबर थंडीच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे.
८) लहान मुलांना बदामाच्या गराचे बारीक बारीक तुकडे करून ते मधाबरोबर खायला द्यावेत म्हणजे थंडीच्या दिवसात उद्धभवणा-या विकाराबरोबर त्यांचे रक्षण होते.
९) तुळशीचा रस व मध घेतल्यास थंडीमुळे येणारा ताप उतरतो.
१०) पुदिन्याचा रस व मध मिसळून घेतल्यास ताप उतरतो.
११) कोरफड पानातील गर आणि खोबरेल तेल मिक्स करून चांगले चोळून अंगाला लावणे. 15  मिनिटांनी गरम पाण्याणे अंघोळ करणे. मात्र साबण वापरू नये. त्वचा मुलायम राहते. त्वचा रोग नष्ट होतात. थंडीचा त्रास होत नाही. तसेच याने दात घासल्याने दातांचे विकार होत नाहीत. 

नुकतीच थंडीची चाहूल लागत आहे. आणि वातावरणात बदल झाल्यामुळे अनेक त्रास लहानपणापासून ते वयोवृद्धांना सर्दि, ताप, व्हायरल इन्फेक्षन, खोकला, कफ, घसा दुखणे
अशा त्रासाला सामोरे जावे लागते. 
तेव्हा या सर्व आजारावर खालील उपाय करा व निरोगी रहा.👇

1) आलं 1 तुकडा + 10/15 तुळशीची पाने + 5 काळेमिरे. जर खोकला असेल तर 5 लवंग हे मिक्सरमध्ये बारीक करून 2 ग्लास पाणी टाकून उकळून पाणी एक ग्लास होईपर्यंत ऊकळू द्या 4 भाग करून दिवसात 4 वेळा घ्या. कोमट घ्या त्यात तुम्ही आणखी पाणी अँड करू शकता.
ताप सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्षन 2 तासात गायब होईल. हा प्रयोग 4 दिवस करा. फॅन, AC टाळा. शक्यतो कोमट पाणी प्या. 4 दिवसात 100% बरे व्हाल.

2) सर्दीमुळे  घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते. लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतो. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते. घशात जळजळ, घसा बसणे, वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

 *भेगाळलेल्या  टाचांसाठी...*

टाचांना भेगा पडल्या असतील तर, हि गोष्ट आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेही रुग्णांना तर पायाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. भेगाळलेल्या टाचांना बाय बाय करायचे असेल तर खालील उपाय करून पहा :

 बदाम, खोबरेल तेल रात्री टाचांना चोळावे आणि सॉक्स घालावेत. यामुळे भेगा कमी होतातच पण हेच तेल त्वचा कोरडी असेल तर अंगाला लावावे त्याने त्वचा नरम होते. 

 पाय स्वच्छ धुवून व्हॅसलीनचे मालिश करून सॉक्स घातल्याने सुद्धा टाचेच्या भेगा कमी होतात.

 घरात बहुदा केळे असते ते कुस्करून भेगाळलेल्या टाचेवर घासून लावावे. त्यापूर्वी टाचा गरम पाण्याने धुवाव्यात. 10-20 मिनिटांनी धुवून टाकावे. 2-3 दिवसात टाचेच्या भेगा भरून येतात. 

 मध साधारण गरम पाण्यात टाकून 10 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवावे आणि प्युमिक स्टोनने टाचा हळुवार घासून स्वच्छ कराव्यात. हा उपाय आठवड्यांतून तीन वेळा करावा.

 *केस पांढरे*

 होण्याची समस्या खूप सतावत असते*. केस पांढरे झाल्यानंतर काय करायला हवे हे त्यांना समजत नाही. कधी तरुण मुलांना देखील ही समस्या निर्माण झालेली दिसत आहे. अनेक लोक केसांना डाय करत असतात. म्हणजेच केसांना काळया रंगाचा कलर दिला जातो. यामुळे फायदा कमी पण नुकसानच जास्त होत असते.

चिंता करण्याची काही गरज नाही आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपा व कमी खर्चात करता येईल असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप जास्त पदार्थांची आवश्यकता भासणार नाही घरामध्ये असलेले काही पदार्थ या उपायासाठी पुरेसे आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे जे आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतील. यासाठी लागणारा पहिला पदार्थ आहे दही. दही हे केसांसाठी किती फायदेशीर मानले जाते. हे सांगण्याची काही गरज नाही दह्या मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे केसांना आरोग्यदायी हेल्दी बनवण्यासाठी फायदेशीर ठरले जाते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल या पदार्थाचे नाव आहे त्रिफळाचूर्ण. अनेक आजारांवर तसेच इतर कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण चा उपयोग केला जातो. अनेकांच्या घरांमध्ये चूर्ण उपलब्ध असते. त्यांच्याकडे हे चूर्ण नसेल तर हे कुठल्याही आयुर्वेदिक दुकानातून किंवा किराणा मालाच्या दुकानातून आणू शकता.
एका लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यावे. त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकावे. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून ठेवावे. काही वेळानंतर हे पूर्णपणे काळे झालेले दिसेल. त्यानंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. आपल्या केसांना हे मिश्रण लावायचे आहे. परंतु लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
आपले केस हे पूर्णपणे सुकलेले असायला हवेत. केसांना मेहंदी ज्याप्रमाणे लावत असतो त्याप्रमाणे हे मिश्रण लावून ठेवावे. ज्या ठिकाणी पांढरे झालेले केस आहे फक्त त्याच ठिकाणी हे मिश्रण तुम्ही लावू शकता. हे मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या ते एका तासानंतर थंड किंवा कोमट पाण्याच्या साह्याने केस धुऊन काढायचे आहेत. त्यानंतर थोडेसे तेल केसांना लावावे.


घरगुती उपचार 

मुळव्याध 

ह्यावर बरीच औषध उपचार आहेत पण आज यांवर पुर्णपणे घरगुती उपाचार बद्दल माहिती घेऊया. 

➡️ लिंबु कापुण त्यावर सैंधव मीठ लावुन ते चाटावे, रक्त पडणे थांबते.
➡️ भाजलेले गरम हरभरे खावे ह्याने उत्तम लाभ होतो.
➡️ मुगाच्या पिठात लिंबाच्या पालाच्या पकोड्या २१ दिवस रोज खाव्यात. 
➡️ २ चमचे कारल्याच्या रसात थोडी साखर टाकुन घेतल्यास लगेच गुण येतो.
➡️ जिरे व मिर्याचे चुर्ण करून मधासोबत घेतल्यास वेदना कमी होतात.
➡️ लिंबोळीच्या बी कुटुन त्याचा लगदा करून त्यात थोडी हिंग टाकुन रोज घेतल्यास गुण येतो. 
➡️ काळेतीळ व मलई एकत्र करून रोज घेतल्यास चांगला गुण येतो. 
➡️ सकाळ चे स्वमुत्र वाटीत घेऊन मुळव्याधाच्या जागी कापसाने लावल्यास त्वरीत आराम होतो. ( स्वमुत्र लावताच थोडी आग होते ) 
➡️ दुधासोबत लिंबाचा रस एकत्र करून घेतल्यास वेदना व रक्त थांबते. ( दुध फुटू नये यासाठी दुध वाटीत टाकत असताना लिंबाचा रस सोबत टाकावा ) 
➡️ रोज सकाळी अनोश्या पोटी साजुक तुप १ चमचा घ्यावे. त्यावर १ तास काही घेऊ नये. 

वरील उपचार हे गुण आलेले व दुष्परिणाम मुक्त आहेत, प्रत्येकाच्या शारिरीक क्षमतेनुसार याचा गुण येऊ शकतो. 

पथ्य - पचनास जड व तीखट खाणे टाळावे. 

निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

: घरगुती तक्रारी आणि औषधे 

तक्रार :- ताप येणे

   घरगुती उपाय :- 

कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

 

तक्रार :- सर्दी

  घरगुती उपाय :-

 आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

 

तक्रार :- खोकला 

 घरगुती उपाय :- 

लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

 

तक्रार :- जुलाब 

 घरगुती उपाय :-

 सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

 

तक्रार :- आव (रक्त पडत नसेल तर)

  घरगुती उपाय :-
 मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

 

 तक्रार :- तोंड येणे

 घरगुती उपाय :-

 जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

 

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन 

 घरगुती उपाय :-

 भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

 

तक्रार :- जंत कृमि 

 घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

 

तक्रार :- सांधे दुखी 

 घरगुती उपाय :-

 सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

 

तक्रार :- मूत्र विकार

  घरगुती उपाय :-

 धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

 

तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )

  घरगुती उपाय :- 

लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

 

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता ) 

घरगुती उपाय :- 

वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

 

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी

  घरगुती उपाय :- 

अमसुलाचे पाणी

 

तक्रार :- भाजणे, पोळणे

 घरगुती उपाय :- 

तूप लावणे

 

 
तक्रार :- जखमा

 घरगुती उपाय :- 

स्वच्छ खोबरेल तेल

 

तक्रार :- दातदुखी

  घरगुती उपाय :- 

तुपाचा बोळा

 

तक्रार :- कानदुखी 

घरगुती उपाय :- 

लसणीचे तेल कानात घालणे

 

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )

  घरगुती उपाय :- 

हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी


 *हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करा.....* 

हिवाळयात डिंकाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच डिंकाचे लाडू गरोदर महिल्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. गरोदर स्त्रियांनी डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. डिंक म्हणजे झाडाचा चिक होय.

डिंक झाडांच्या खोडातून काढला जातो, आणि डिंक तयार केला जातो. 

*डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे...*

महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी म्हंटल्यावर डिंकाचे लाडू आले. हिवाळयात जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू बनवले जाते. डिंक, गव्हाचं पीठ, तुप, खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा हे मिश्रण वापरून लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून डिंकाचे लाडू दिले जातात.

हिवाळयात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते, आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत देखील राहते. म्हणून डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे देखील होतील. डिंकामुळे शरीराला उब देखील मिळते. आणि हिवाळयात शरीराला उबची खूप गरज असते. तसेच ऊर्जा देखील मिळते. तसेच गरोदर महिल्यांसाठी देखील डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहे. गरोदर पणात बाळंतिणीला दूध येण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जाते.

हिवाळयात पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता. डिंकाचे लाडू सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, मात्र डिंकाच्या लाडू मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते, त्यासाठी कमी प्रमाणात आणि गरज असेल तेवढेच सेवन करावे. रोज २ डिंकाचे लाडू सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पण २ पेक्षा जास्त लाडू खाऊ नये. डिंकाची चिक्कीसुध्दा खायाला चांगली असते. त्यामुळे शरीरात शक्ती देखील राहते. जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेक तर तुम्ही डिंकाचे लाडू सेवन करू शकता. डिंकाच्या लाडू मध्ये फॅट्सचे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. म्हणून हिवाळयात डिंकाचे लाडू आवर्जून सेवन करणे.

*सुनील इनामदार.*


   *अ‍ॅलर्जी म्हणजे काय ?*

*कोणाला कशाचे वावडे असते, तर कोणाला कशाचे. अ‍ॅलर्जी हा याचाच एक समानार्थी शब्द म्हणावा लागेल. अनेक स्त्रिया कुंकू लावतात; पण एखादीलाच त्यामुळे कपाळावर पुरळ येते, खाज येते. काँग्रेस गवताला अनेकजण हात लावतात; पण एखाद्यालाच त्वचेवर काळे चट्टे, खाज अशी लक्षणे दिसून येतात. यावरून एक लक्षात येईल की, अ‍ॅलर्जी ही व्यक्ती विशिष्ट आहे. धुळीत काम केल्यावर काहीजणांना खूप शिंका येतात. काहींना दम्याचा त्रास होतो; बऱ्याच लोकांवर मात्र काहीच दुष्परिणाम होत नाही.*

*अ‍ॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात. अ‍ॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा 'अ' पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोटया श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून रक्तदाब कमी होतो. याखेरीज पूरळ येणे, खाज येणे अशी स्थानिक लक्षणेही दिसतात. रुग्णाला चक्कर येते. श्वास घ्यायला त्रास होतो. गंभीर प्रकारच्या अ‍ॅलर्जी मध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.*

*हे टाळण्यासाठी कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे ते शोधून त्याचे डिसेन्सेटायझेशन करता येते. डिसेन्सेटायझेशन म्हणजे ज्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे तो पदार्थ आधी अल्प प्रमाणात व त्यानंतर हळूहळू वाढत्या प्रमाणात इंजेक्शनद्वारे शरीरात सोडला जातो. असे केल्याने त्या पदार्थाची अ‍ॅलर्जी राहत नाही. तसेच कोणतेही इंजेक्शन देताना आधी थोड्या प्रमाणात त्वचेत टोचून अ‍ॅलर्जी आहे का ते बघता येते. अ‍ॅलर्जी असेल त्या पदार्थापासून (जसे धूळ, परागकण इ.) दूर राहणे हाही अ‍ॅलर्जी पासून वाचण्याचा एक मार्ग आहे. हिस्टामीन विरोधी औषघे, स्टेरॉईड सारखी औषधे यांचाही उपयोग होऊ शकतो.*

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*    


*महिलांमध्ये वाढतेय पाठीचे दुखणे, सर्वेक्षणातील अहवाल : गंभीर होण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.*  

*रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणा-या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणा-या पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर आल्यावर उपचार सुरू केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.*

*मुंबई : रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणा-या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणा-या पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे गंभीर वळणावर आल्यावर उपचार सुरू केल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.*

*मुंबईतील एका सुप्रसिद्ध रुग्णालयातील आॅर्थोपेडिक डॉक्टरांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात दुखण्याकडे लक्ष न देता शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत लांबवितात. तर पुरुष दुखणे कमी प्रमाणात सहन करतात, ९० टक्के पुरुष ५ वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात. प्रसूती झाल्यावर किंवा गर्भारपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्यात बहुतेक वेळेस चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते. अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ यामुळे दुखणे बळावते. सतत काम करत राहिल्यामुळे, वाकल्यामुळे किंवा जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास उद्भवतो. त्यामुळे प्राथमिक दुखणे असताना महिलांना उपचार घेणे जरुरीचे आहे.*

*महिलांवर जबाबदा-यांचे जास्त ओझे असल्याने अनेकदा समतोल राखताना त्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. ब-याचदा महिला छोट्या-छोट्या आरोग्य तक्रारींकडे लक्ष देत नाहीत. मात्र याच तक्रारी भविष्यात मोठ्या आजारांना निमंत्रण देतात, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.*

*पाठीच्या कण्याचा त्रास, डी जीवनसत्वाचा अभाव, कॅल्शियमचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत. म्हणून महिलांनी वेळीच उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.*

*डॉ. विशाल पेशट्टीवावर.*

*पाठदुखीची कारणे.*
*खुर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते.*

*दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणा-या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणा-यांना हमखास पाठदुखी सतावते. वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते.*

*अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने. अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठदुखी होते.*

*उपाय*
*वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला. एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या. टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा, गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा.*

*झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा. आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा, पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.*

No comments:

Post a Comment