" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उदगीर किल्ला, साखर कारखाना व साईधाम पर्यटन स्थळास भेट

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उदगीर किल्ला, साखर कारखाना व साईधाम पर्यटन स्थळास  भेट.* 

  









































































































































































































*उदगीर- तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची  शैक्षणिक सहल उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला, प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना, साईधाम तोंडार पाटी पर्यटन स्थळास  शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.  प्रथम उदगीर येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यात आला. संपूर्ण किल्ला पाहण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या किल्ल्याची संपूर्ण माहिती उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी' असे होते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'उदकगिरी' नावाने करण्यात आला आहे. उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात. त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्‍त्‍व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी 1760 मध्ये निजामाविरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याकाळचे काही अवशेष आजही पाहता येतात. उदगीरच्या किल्ल्याचा उल्लेख अकराव्या शतकातील शिलालेखांसोबत पुराण कथांमध्येही आढळतो. 'करबसवेश्वर ग्रंथ' या पोथीतील कथेनुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींना 'मी या ठिकाणी लिंग रुपाने प्रगट होईन' असा आशिर्वाद दिला. त्या ठिकाणी जमिनीतून एक लिंग हळुहळू वर आले. पुढील काळात त्या ठिकाणी वस्ती वाढली. नगर वसले. त्यास उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबा महाराजांचा मठ व शिवलिंग आहे. अशी सविस्तर किल्यांची माहिती दिली. ऐतिहासिक किल्ला पाहणीनंतर साईधाम तोंडार पाटी येथील पर्यटन स्थळास प्रथम साईबाबा मंदिर देवदर्शन करून संपूर्ण गार्डन मध्ये विविध खेळ उपकरणे यांचा विद्यार्थ्यांनी  खूप आनंद घेतला. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी जेवण झाल्यावर प्रियदर्शिनी (विकास) साखर कारखाना येथील स्थळास भेट दिली. सर्व विद्यार्थ्यांना साखर कशी तयार होते या विषयी व विविध यंत्र दाखवून माहिती दिली. प्रत्यक्षात साखर अशी तयार होते हे पाहून कारखान्याचे अधिकारी यांनी सर्व विद्यार्थीना साखर खाण्यासाठी दिली. तद्नंतर साखर पोते ठेवण्याचे गोदाम पाहिले. नंतर कारखाना परिसरात असलेल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी नावाने ओळखतात. या कारखान्याचे नाव प्रियदर्शनी साखर कारखाना आहे असे सांगितले. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे,  शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस, भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, शाळेचे पालक राजकुमार श्रीमंगले, शंकर कांबळे, आनंद कांबळे, विशाल तवर आदी जन शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित होते.शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला व शैक्षणिक सहल आयोजन बदल खुप आनंदायी , उत्साह,व लय भारी मजा आली आली व खुप काही माहिती मिळाली असे विद्यार्थ्यांनी व पालकांनी बोलून दाखवले. या शैक्षणिक सहलीसाठी उपस्थित राहून मदत व सहकार्य केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले*

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...