Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, August 30, 2023

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक


सविस्तर माहिती साठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करा 
⬇️सौजन्य - MAHANEWS18.COM




राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरल्या जात आहेत. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार. म्हणून एकाच पदासाठी जास्त जिल्हा परिषदेत अर्ज करू नये. शुल्काचा नाहक खर्च होणार. प्रवेशपत्र हे संगणीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रनुसार उमेदवारास एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यावर त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषद जाहिरात – ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

तपशील दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक ०५/०८/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २५/०८/२०२३
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत २५/०८/२०२३
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी ७ दिवस

अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची सुचना –

अ) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये, जेणेकरून अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होणार नाही.

ब) भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास ही जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू. १०००/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रू.९००/-
अनाथ उमेदवारांसाठी रू.९००/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची (पावती) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील

Monday, August 21, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी सणा निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी सणा निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर.*

*तिवटग्याळ .....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 21/8/2023 रोजी मोठ्या उत्साहात नागपंचमी  निमित्त  शाळेत शैक्षणिक भुलई   जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व मुलींनी ना साडी हा  पोशाख परिधान करून शाळेत  नागपंचमी या सणा निमित्ताने यावे असे सांगितले. तद्नंतर नागपंचमी सणांवर आधारित शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी नागपंचमी या सणा विषयी सविस्तर माहिती दिली. हा श्रावण महिन्यातील सण आहे.या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.नागपंचमी पूजा करताना महिला आणि पुरुष दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते. शालेय गीते, बडबड गीते, कविता,  भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी अतिशय सुंदर विविध शालेय गीते, कविता, बडबड गीते, गवळण व अन्य नागपंचमी सणाच्या निमित्ताने कला फुगडी, झिम्मा आदी उपक्रम घेतले. विद्यार्थ्याना अतिशय आनंददायी पध्दतीने कला गुणांचा वाव देऊन नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते*





































































प्राथमिक पदवीधर व केंद्र प्रमूख पदोन्नती एक वेतनवाढ मंजूर बाबत प्रशासकीय परीपत्रक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक



प्राथमिक पदवीधर व केंद्र प्रमूख पदोन्नती एक वेतनवाढ मंजूर बाबत प्रशासकीय परीपत्रक
⬇️


https://drive.google.com/file/d/1iqhQJswltdaV-0lUox8RlC4ppAcv3DlT/view?usp=drivesdk

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे 76 वा स्वातंत्र दिन तसेच आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 15 आॅगस्ट तिसरा ध्वजारोहन व इतर कार्यक्रम सोहळा संपन्न

*🇳🇪तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे 76 वा स्वातंत्र दिन तसेच आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 15 आॅगस्ट तिसरा ध्वजारोहन व इतर कार्यक्रम सोहळा संपन्न*


*तिवटग्याळ- तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 15/8/2023 रोजी 76 वा स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम आज तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व मा. सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात ध्वजारोहन करण्यात आले. अतिशय  उत्साहाने 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत तिसरा ध्वजारोहन खुप उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक तसेच मा. प्रशांत पाटील सरपंच, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयशिंग पाटील, आॅपरेटर विनोद बिरादार, प्रवीण कांबळे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर , बचतगट अध्यक्षा गीता कच्छवे, जयदेवी पाटील, अश्विनी कांबळे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पाटील, निवृत्ती पाटील,अशोक पाटील, बालाजी पाटील, सुर्यकांत पाटील शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मा. ज्ञानेश्वर बडगे व मा. सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रमाची माहिती दिली व  15 आॅगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने ध्वजारोहन, हर घर तिरंगा या विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी  मा. प्रशांत पाटील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयशिंग पाटील शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, बचतगट अध्यक्षा गीता कच्छवे, जयदेवी पाटील, अश्विनी कांबळे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पाटील, आदी जण उपस्थित होते./तद्नंतर ग्रामपंचायत च्या वतीने शाळेतील विविध स्पर्धत प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या व गावातील लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या सैनिक हे देशसेवा कर्तव्य बजावत आहेत त्यांचे कार्य खूप कौतूकास्पद असल्याने त्यांच्या वडिलांचा व नातेवाईक यांचा लष्करी सेवेतील मा. नामदेव पाटील, मा. गणपत पाटील, सिध्देश्वर पाटील, विष्णूकांत पाटील व स्वातंत्र्य सैनिक मा. निवृत्ती पाटील, रावसाहेब पाटील व गंगाधर नरहरे यांचा मा. सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थाना व उपस्थित सर्वांना गोपाळ पंगत म्हणून मा. रमेश साळुंके व प्रशांत पाटील यांच्या वतीने भात, वरण, जिलेबी व पेढे देऊन जेवण्याची मेजवानी दिली. मा. सरपंच प्रशांत पाटील व ग्रामपंचायत च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल सर्वांनी अभिनंदन केले व कौतुकास्पद आपण उपक्रम राबविण्यात आला या बद्दल सर्वानुमते अभिनंदन करुन आभार व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ च्या वतीने निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गटातील माता पालक सदस्यांचा व माता लिडर मा. गीता ताई कच्छवे, सत्यभामा साळुंके, वर्षा श्रीमंगले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*