विवाह नोंदणी आवश्यक कागदपत्रे
Wednesday, June 26, 2024
मुख्याध्यापिका श्यामला ढोकाडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न
*मुख्याध्यापिका श्यामला ढोकाडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*
उदगीर - तोंडचिर केंद्राच्या वतीने बेलसकरगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सपत्नीक आज दिनांक 26/6/2024 रोजी सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या तोंडचिर व बेलसकरगा शाळेच्या आदर्श, उपक्रमशील व शिस्तप्रिय मुख्याध्यापिका आदरणीय व्यक्तिमत्व मा. श्यामला ढोकाडे दिनांक 30/6/2024 रोजी सेवा निवृत्त होत असल्याने तोंडचिर केंद्राच्या वतीने आज दिनांक 26/6/2024 रोजी सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. मॅडम साहेबांचा गेल्या 6 तोंडचिर व उदगीर तालुक्यातील वर्षातील 39 वर्षे कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही.शिस्त, सकारात्मक वृत्ती, वक्तशीरपणा, हजरजबाबी नेतृत्व व अभ्यासू असलेल्या त्यांचा दृष्टिकोन अनेक शिक्षक बंधू भगिनी च्या हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार जिल्हा परिषद शाळा बेलसकरगा येथे तोंडचिर केंद्र व इतर केंद्रातील व लातूर जिल्ह्य़ातील शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकात उपक्रमशील शिक्षक मा. रामशेट्टे सर यांनी त्यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी शेख शफी प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी मा नितीन लोहकरे,शिवशंकर पाटील ,राजे साहेब केंद्रप्रमुख स्वामी श्रीदेवी, मुख्याध्यापीका अंजली स्वामी तसेच केंद्र प्रमुख आजी व माजी शिक्षण विस्तार अधिकारी आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उदगीर तालुका अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.मॅडम साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून शिक्षक शाम राठोड, केंद्रप्रमुख बालाजी धमनसूरे, रामशेट्टे सर, मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांनी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका होत्या असे मनोगतपत भाषणातून व्यक्त केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी उदगीर तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, उदगीर शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी तोंडचिर केंद्रातील सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावणगाव शाळेतील शिक्षक श्याम राठोड व आभार रामशेट्टेसर व सत्कार मुर्ती मा. मुख्याध्यापिका श्मामला ढोकाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी*
*तिवटग्याळ - आज दिनांक 26/6/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे 26 जून 2024 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व पालक व शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*
Monday, June 24, 2024
शाळापूर्व तयारी मेळावा क्र.02, 18 ते 25 जून 2024
प्रिय सर
सर्व शाळेतील शाळा पूर्वतयारी मेळावे दोन चे आयोजन झाल्यानंतर ऑनलाइन लिंक मध्ये भरावयाची माहिती पुढील प्रमाणे.
*1) मेळाव्या संदर्भात माहिती*
मेळावा क्रमांक 2 चे आयोजन झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मेळावा संदर्भात माहिती मिळावा क्रमांक दोन मध्ये भरावी.
*2) मेळावा भेट संदर्भात माहिती*
शाळा स्तरावर आयोजित मेळाव्यास भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी मेळावा भेट संदर्भात माहिती भरावी.
*3)SBA सॅम्पल आधारित मूल्यांकन*
मेळावा क्रमांक 2 ला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या शाळेतील 7 ते 10 मुलांचे सँपल सर्वेक्षण संपल आधारित मूल्यांकन मध्ये भरावे.
*4) दाखल पात्र मुलांची सविस्तर माहिती*
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता 1ली वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी दाखल पात्र मुलांची सविस्तर माहिती भरावी.
याप्रमाणे आपणास पाठविण्यात येणाऱ्या लिंक मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनीमाहिती भरून घ्यावी......🙏
माहिती भरण्याकरिता लिंक पाठवण्यात येत आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण Gr दि.०५ जुलै ते २० जुलै,२०२४ या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत
*📕शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण Gr*
*दि.०५ जुलै ते २० जुलै,२०२४ या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत*
➖➖➖➖➖➖➖
👇
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 चे आयोजन
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 चे आयोजन*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 22/6/2024 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके, प्रियंका तोमर पाटील, सोनाली पाटील , अलका पाटील,जयदेवी बिरादार रंजना पाटील गीता कच्छवे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2024-25 - शैक्षणिक वर्ष ता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.सर्व प्रवेशनिश्चित मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी 1 ते 7 स्टॉल चे नावनोंदणी आणि रिपोर्ट कार्ड, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास,भाषा विकास, गणन पुर्व तयारी या आदी विषयांवर विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या शाळा पूर्व मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या मेळाव्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी केले. यावेळी उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके, प्रियंका तोमर पाटील, सोनाली पाटील , अलका पाटील,जयदेवी बिरादार रंजना पाटील गीता कच्छवे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व आदी जण उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले.*
Subscribe to:
Posts (Atom)