Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, June 24, 2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 चे आयोजन


*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 चे आयोजन*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 22/6/2024 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा क्र 2 आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला  प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके, प्रियंका तोमर पाटील, सोनाली पाटील , अलका पाटील,जयदेवी बिरादार रंजना पाटील गीता कच्छवे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2024-25 -  शैक्षणिक वर्ष ता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहाराने  स्वागत करण्यात आले.सर्व प्रवेशनिश्चित मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी 1 ते 7 स्टॉल चे नावनोंदणी आणि रिपोर्ट कार्ड, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास,भाषा विकास, गणन पुर्व तयारी या आदी विषयांवर विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या शाळा पूर्व मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या मेळाव्याचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी केले. यावेळी उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके, प्रियंका तोमर पाटील, सोनाली पाटील , अलका पाटील,जयदेवी बिरादार रंजना पाटील गीता कच्छवे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे व आदी जण उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर यांनी मानले.*
































































































No comments:

Post a Comment