Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, July 23, 2024

अर्थसंकल्पाचे सन 2024-25 संपूर्ण माहिती pdf

अर्थसंकल्पीय अंदाज 2024-25


व्याजाच्या रकमांखेरीज एकूण उत्पन्न 32.07 लाख कोटी रुपये असेल

एकूण व्यय 48.21 लाख कोटी रुपये असेल

एकूण कर संकलन 25.83 लाख कोटी रुपये


वित्तीय तूट जीडीपीच्या 4.9 टक्के राहील असा अंदाज आहे.

पुढील वर्षीपर्यंत वित्तीय तूट 4.5 टक्के ठेवण्याचे केंद्रसरकारचे उद्दिष्ट आहे.

चलनफुगवट्याचा दर कमी, स्थिर 4% लक्ष्याकडे वाटचाल करेल. मूळ चलनवाढ (अन्न आणि इंधन यांचा समावेश नसलेले) 3.1% असेल.


अर्थसंकल्पाचा भर प्रामुख्याने रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर आहे.

रोजगार आणि कौशल्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांचे पॅकेज

आगामी 5 वर्षांच्या कालावधीत देशातील 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार, कौशल्य आणि इतर संधींसाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज.


1. योजना अ नवीन कर्मचारीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत असलेल्या

पहिल्या वेळेच्या कर्मचाऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 15,000 रुपये पर्यंतचे एक महिन्याचे वेतन दिले जाईल.

2. योजना ब उत्पादनक्षेत्रात रोजगारनिर्मितीः रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ ओ योगदानाच्या संदर्भात, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही विशिष्ट प्रमाणात थेट प्रोत्साहन दिले जाईल.
3.
• उत्पादन क्षेत्रातील एमएसएमईसाठी पत हमी योजना

• यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी एमएसएमईंना मुदतीच्या कर्जामध्ये अप्रत्यक्ष किंवा तृतीय-पक्ष हमीशिवाय पत हमी योजना.

• तणावाच्या काळात एमएसएमईंना पतपुरवठ्यात सहाय्य

एमएसएमईंना त्यांच्या तणावाच्या काळात बँकेकडून पतपुरवठा चालू ठेवण्याची सुविधा देण्यासाठी नवीन यंत्रणा.

मुद्रा कर्ज

ज्यांनी मागील कर्ज यशस्वीपणे फेडले आहे त्यांच्यासाठी ‘तरुण’ श्रेणीतील मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवली जाणार

टीआरईडीएस प्लॅटफॉर्मवर अनिवार्य ऑनबोर्डिंगसाठी वाढीव संधी

टीआरईडीएस प्लॅटफॉर्मवर अनिवार्य ऑनबोर्डिंगसाठी वार्षिक उलाढालीची मर्यादा 500 कोटींवरून 250

कोटींपर्यंत कमी केली जाणार.

एमएसएमईमध्ये अन्न विकिरण, गुणवत्ता आणि सुरक्षितता चाचणी युनिट्स

एमएसएमई क्षेत्रात 50 बहु-उत्पादन खाद्य विकिरण युनिट्स स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य.

ई-कॉमर्स निर्यात केंद्र

एमएसएमई आणि पारंपारिक कारागिरांना त्यांची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकता यावीत यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत ई-कॉमर्स निर्यात केंद्र स्थापन केले जाणार

क्रिटिकल, अर्थात महत्वाची खनिजे मोहीम

महत्वाच्या खनिजांचे देशांतर्गत उत्पादन, पुनर्वापर आणि खनिज मालमत्तेचे परदेशात अधिग्रहण करण्यासाठी ‘महत्वाची खनिजे मोहीमें’ची सुरुवात केली जाईल.

ऑफशोअर, अर्थात खोल समदातील खनिज उत्खनन


Download here to click 
👇








क्रिडा प्रतिज्ञा शिक्षण सप्ताह अंतर्गत

क्रिडा प्रतिज्ञा 

आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या , क्रीडामहोत्सवात होणाऱ्या क्रीडाप्रकारात, आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडामहोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडामहोत्सवात भाग घेऊ.
!! जय हिंद !!


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शिक्षण सप्ताहास सुरुवात

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शिक्षण सप्ताहास सुरुवात* 

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथे आज शालेय परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने दिनांक 22 जूलै ते 28 जूलै 2024 पर्यंत शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहात दररोज एक वेगळा विषय, घटक आहे त्या विषयावर दैनंदिन शिक्षण सप्ताह उपक्रम राबविण्यात येत आहे असे सांगितले व आजचा विषय अध्ययन अध्यापन (TLM) teaching learning material. आज हा विषय सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे असे सांगितले व इयत्ता निहाय आजच्या विषयाचे स्टॉल मांडण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने आजचा शिक्षण सप्ताह उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर आदींनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीताताई कच्छवे, सत्यभामा साळुंके, मनिषा आरकिले, कोरे व नरहरे ताई आदी पालक उपस्थित होते.























Udise + ला इयत्ता पहिली विद्यार्थी नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती शैक्षणिक वर्ष 2024-2025

Udise + ला इयत्ता पहिली विद्यार्थी नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती शैक्षणिक वर्ष 2024-2025


आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी


*आषाढी एकादशी निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची दिंडी* 

तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 17/7/2024 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,नामदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताताई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले. 
तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मूक्ताबाई बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत भजन, भावगीते, गवळण म्हणत प्रथम मारोती मंदिर परिसरात रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील विठ्ठल भक्तांनी भजन, भावगीते, गवळण सादर केली.  गावातील वारकरी जेष्ठ नागरिक  रामचंद्र पाटील, बापूराव येणगे,गोविंदराव बिरादार व रावसाहेब पाटील शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, गावातील माजी  अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीता कच्छवे,सत्यभामा साळुंके, अलका पाटील, आशा पाटील तसेच जेष्ठ महिला व पुरुष मंडळीनी उत्स्फूर्तपणे साद दिली. रिंगण सोहळयात विविध संत विठोबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा विविध वारकरी पोशाखात विद्यार्थ्यांनी भजन, भावगीते, गवळण म्हणून अतिशय सुंदर सादरीकरण केले. या दिंडी सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक रामचंद्र पाटील, बापूराव येणगे, गोविंदराव बिरादार, रावसाहेब पाटील अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, सत्यभामा साळुंके मदतनीस  भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, गीता कच्छवे, आशा पाटील, अलका पाटील आदी जणांनी विद्यार्थ्यांना दिंडी सोहळास मार्गदर्शन केले. तद्नंतर गावातील  नागरिक नवनाथ कच्छवे व गीता कच्छवे, छगनसिंग बिरादार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अन्न छत्र फराळ शाबुदाणा खिचडी व चहा दिले.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप केली. महा आरती रामचंद्र पाटील, बापूराव येणगे, गोविंदराव बिरादार, रावसाहेब पाटील व उपस्थित सर्व विठ्ठल भक्त बाल वारकरी यांनी केली. नंतर या दिमाखदार आषाढी एकादशी निमित्ताने बालचमूची दिंडी सोहळा संपन्न झाला. अतिशय सुंदर व देखणा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.