मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर वार्ता....... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पहिल्यांदाच ऑनलाईन माहिती च्या द्वारे सन 2019 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार उदगीर तालुक्यातील रा्वणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती वतीने दिनांक 23/2/2019 रोजी सरस्वती भुवन औरंगपुरा औरंगाबाद येथे मा.ना. हरीभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या वेळी डॉ भागवत कराड अध्यक्ष मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, गिरीश बोराळकर भाजपा प्रवक्ते, गोविंद केंद्रे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे, राज्याध्यक्ष अंकुश काळे, महेश तांदळे राजाध्यक्ष माध्यमिक शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे मित्र परिवार कडून अभिनंदन करत आहे.
No comments:
Post a Comment