Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, March 13, 2019

प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा.


उदगीर वार्ता....... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26/1/2019 रोजी 70 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना घेऊन गावात देशभक्ती गीत व विविध घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. तद्नंतर शाळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरीक यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रजासत्ताक दिना साठी उपस्थित असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अकबर पटेल अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,श्री मष्णाजी गायकवाड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री शिवराज बिरगे माजी चेअरमन,  श्री कोयले गुरूजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक,श्री डोणगापुरे मामा,श्री माधवराव पाटील,श्री अलीम सय्यद,श्री ईस्माईल पटेल,श्री कारभारी मामा आदी जणांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.तद्नंतर श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रजासत्ताक दिना विषयावर सविस्तर माहिती दिली व शाळेतील शैक्षणिक प्रगती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत विविध नेत्यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.या मध्ये सुविधा गायकवाड, यशवंत गायकवाड इयत्ता पहिली, आशा कांबळे, प्रांजली गायकवाड, इयत्ता तिसरी, तैरीम सय्यद, जिशान सय्यद, रोहित गायकवाड इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे सादर केली. तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त देशभक्ती गीत सादरीकरण करण्यात आले. गीत सादरीकरणा नंतर प्रजासत्ताक दिना निमित्त विविध पंधरा खेळाचे आयोजन करण्यात आले होते या खेळात इयत्ता निहाय पहिला, दुसरा क्रमांक वैयक्तिक व सा़ंघिक विजेता स्पर्धकांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, कंपास,स्केल,ऱंगीत काडी,स्केच पेन, उजळणी पुस्तक, आदी वस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनिता पोलावार व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment