Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, March 13, 2019

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती साठी हा उपक्रम साजरा. उदगीर वार्ता........ राववणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 4/2/2019 रोजी 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिना निमित्त शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक कर्करोग दिन आहे,आपली शाळा तंबाखू मुक्त आहे व आपले पालक सुध्दा व्यसनमुक्त झाले पाहिजे असे सांगितले व आपणं सर्वांनी आपल्या पालकांना एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबवून व्ससन मुक्ती चा संदेश देऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करू असे सांगितले व एक पत्र व्यसनमुक्ती साठी चा संदेश प्रत्यक्ष पोष्ट कार्ड वर विद्यार्थ्यांना स्वत लिहण्यास सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात एक पत्र व्यसनमुक्ती चा संदेश लिहून पालकांना दिले. *प्रिय बाबा,* *बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे की तुमची तब्येत आता पूर्वी सारखी राहिली नाही.* *तुमचे वजन कमी होत आहे, थकवा येतो आणि भूकही लागत नाही.* आमच्या शाळेत आम्ही तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबवीत आहोत.* *आम्ही विद्यार्थ्यांनी तर पक्क ठरविले आहे की आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही.* *आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने आमच्या शाळेत एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम आम्ही विद्यार्थी राबवीत आहोत.* *मीही तुम्हाला एक पत्र लिहीत आहे. तुम्हीही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपले व्यसन सोडा. तुमची तब्येत चांगली राहिली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल* बाबा, तुम्ही मला आज वचन द्या की आजन्म व्यसनमुक्त राहणार... मीही पुढील पाच महिने तुमचा पाठपुरावा करणार आहे. तुमचा मुलगा/मुलगी *xxxxxxxxxx* असा व्यसनमुक्ती चा संदेश देऊन एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,शिक्षीका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल,खमर सय्यद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती साठी हा उपक्रम साजरा.


उदगीर वार्ता........ राववणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 4/2/2019 रोजी 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिना निमित्त शाळेत एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक कर्करोग दिन आहे,आपली शाळा तंबाखू मुक्त आहे व आपले पालक सुध्दा व्यसनमुक्त झाले पाहिजे असे सांगितले व आपणं सर्वांनी आपल्या पालकांना एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबवून व्ससन मुक्ती चा संदेश देऊन गाव व्यसनमुक्त करण्यासाठी मदत करू असे सांगितले व एक पत्र व्यसनमुक्ती साठी चा संदेश प्रत्यक्ष पोष्ट कार्ड वर विद्यार्थ्यांना स्वत लिहण्यास सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व हस्ताक्षरात एक पत्र व्यसनमुक्ती चा संदेश लिहून पालकांना दिले.

*प्रिय बाबा,*

*बऱ्याच दिवसापासून मी पाहत आहे की तुमची तब्येत आता पूर्वी सारखी राहिली नाही.*

*तुमचे वजन कमी होत आहे, थकवा येतो आणि भूकही लागत नाही.*

आमच्या शाळेत आम्ही तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबवीत आहोत.*

*आम्ही विद्यार्थ्यांनी तर पक्क ठरविले आहे की आम्ही कोणतेही व्यसन करणार नाही.*

*आज ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असल्याने आमच्या शाळेत एक पत्र व्यसनमुक्तीसाठी हा उपक्रम आम्ही विद्यार्थी राबवीत आहोत.*

*मीही तुम्हाला एक पत्र लिहीत आहे. तुम्हीही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपले व्यसन सोडा. तुमची तब्येत चांगली राहिली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल*

बाबा, तुम्ही मला आज वचन द्या की आजन्म व्यसनमुक्त राहणार... मीही पुढील पाच महिने तुमचा पाठपुरावा करणार आहे.


तुमचा मुलगा/मुलगी

*xxxxxxxxxx*


असा व्यसनमुक्ती चा संदेश देऊन एक पत्र व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे,शिक्षीका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर पटेल,खमर सय्यद व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते







No comments:

Post a Comment