➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संविधान दिनानिमित्त घोषणा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*घोषणा*
*१.*. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
*२.* अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
*३.* लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
*४.* तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
*५.* ना एक धर्म से, ना एक सोच से
ये देश चलता है संविधान से!
*६.* दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता
*७.* समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची
*८.* स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय
*९.* संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
*१०.* संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी
*११.* ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो
*१२.* जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू
*१३.* संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे
*१४.* संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान
*१५.* संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
*१६.* संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत
*१७.* घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे
*१८.* अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा
*१९.* भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान
*२०.* स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता
*२१.* वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी
*२२.* बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान
*२३.* लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान
*२४.* भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
*२५.* समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या
*२७.* सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान
*२८.* संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
No comments:
Post a Comment