महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा मराठवाडा विभागीय मेळावा २५ नोव्हेंबर रोजी शिक्षक पतसंस्थेच्या हडको येथील कार्यालयात दुपारी 1 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे , मेळावाचे उद्घाटक म्हणून राज्य अध्यक्ष अंकूश काळे यांना निमंत्रित करण्यात आले असून संघटनेचे संस्थापक मा श्री दिलीप ढाकणे , राज्य नेते मा केसी गाडेकर,महिला आघाडीच्या श्रीमती सुषमा राऊतमारे, राज्य सचिव श्री माधव लातुरे , सम्पर्क प्रमुख श्री सचिन हांगे,राज्यसह सचिव मा अंजुम पठाण माध्यमिक विभागाचे मा अनिल बिंगेवार, मा श्रीकृष्ण सपकाळ,मा गजानन वाळके पाटील यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहेत, या मेळाव्याला विभागातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना ,सर्व जिल्ह्यातील आदर्श चे जिल्हा अध्यक्ष, सचिव, माध्यमिक विभाग, महिला आघाडीचे सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहेत, मेळाव्यात प्राथमिक शिक्षक,प्रशाला शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक, खाजगी विनाअनुदानित शिक्षक, शाळा विद्यालय विद्यार्थी व शिक्षण यांचे राज्य व जिल्हा स्तरीय प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करून मागण्याचे निवेदन विभागीय शाखेमार्फत सरकारकडे देण्यात येणार आहे, याच बरोबर संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा तसेच पदवीधर निवडणूक विषयी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे मत जाणून घेऊन त्या दृष्टीने बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे, विभागात सर्वाधिक पदवीधर सदस्य नोंदणी आदर्श ने केलेली असल्याने आदर्श शिक्षक समितीच्या भूमिकेकडे विभागाचे लक्ष लागून आहे अशी माहिती संस्थापक दिलीप ढाकणे, मराठवाडा प्रमुख आर आर जोशी, विभागीय सचिव शशीकांत पा डांगे, कोषाध्यक्ष जयाजी भोसले,सहसचिव बाजीराव ताठे ,उपाध्यक्ष केशव घुगे, कैलास पगारे, माध्यमिक विभागाचे प्रमुख गंगाधर साखरे, आदींनी कळविले आहे, औरंगाबाद येथे होणाऱ्या मेळाव्यात विभागातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श शिक्षक समिती औरंगाबाद जिल्हा शाखाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाटील बरबंडे, राजेश आचारी, संतोष जाधव, संजीव देवरे, शिवाजी एरंडे, सोमनाथ रासकर, शाकिर अली सय्यद, बाबूलाल राठोड, संजय कुलकर्णी, राजेंद्र डमाळे, बाबासाहेब सांगळे, शांताराम तोरणमल, संजय जैन,संजय गायकवाड, नजीर शेख, संतोष कवडे, नाना साहेब शिंदे, संभाजी खंदारे, आदीने केले आहे
विद्यार्थी -शिक्षण हक्कासाठी,,,,
शिक्षकांच्या सन्मानासाठी...आदर्श शिक्षक समितो महाराष्ट्र राज्य .
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आदर्श शिक्षक समिती महाराष्ट्र व लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment