Friday, January 29, 2021
संपूर्ण महाराष्ट्रातील एस. टी. बसस्थानकाचे संपर्क नंबर.
Wednesday, January 27, 2021
आज शाळा मुलांना पाहून गजबजली..
*आज शाळा मुलांना पाहून गजबजली..*
-------------------------------------------
*🔔आई मला शाळेला जायचं जाऊ देना मंग....; विद्यार्थी आतूर, आजपासून घंटा वाजली*
--------------------------
◼️ तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून (दि. २७) पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शिक्षणाचा प्रवाह पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत बेंचवर बसण्याचा आनंद लुटण्यासाठी शाळकरी मुले आतूर झाली होती.
विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देताना पालकाचे संमत्तीपत्र सक्तीचे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तशा सूचना शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत.
*१५ मार्चपासून विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे नव्या आरंभासाठी ते उत्सुक आहेत. मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार याचीही उत्सुकता लागून होती.*
तीन-चार महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात फारसे शिरलेले नाही.ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करायला लागतोय. मोबाइल उपलब्ध नसण्यापासून रेंज नसण्यापर्यंतची डोकेदुखी विद्यार्थ्यांपुढे आहे.मुले महिनो न महिने घरीच राहिल्याने पालकही चिंतीत आहेत. घरातील दोघा-तिघा मुलांना एकच मोबाईल कसा पुरणार, ही मोठी समस्या त्यांच्यापुढे आहे. जिल्हा परिषद शाळांचे विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल अत्यंत चांगले आहेत. खासगी शाळांना याबाबतीत कोसो दूर फेकले आहे. पण वर्ग सुरू नसल्याने ही गुणवत्ता कशी टिकणार, हा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक व पालकांपुढे आहे.
*⭕वर्गांची तयारी सोमवारपासूनच*
शाळांमध्ये पुनश्च हरिओम करण्यासाठी शिक्षकांची तयारी सोमवारपासाूनच सुरू झाली. मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता व इतर तयारीसाठी शिक्षक सकाळपासूनच कामाला लागले होते. शाळेतील वर्गांचे निर्जंतुकीकरण मंगळवारी करण्यात आले.ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसाठी साहित्य दिले, तर काही ठिकाणी पालक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, फवारणी पंप उपलब्ध करून दिले. छोट्या गावांत खुद्द मुलेच साफसफाईच्या कामासाठी स्वेच्छेने पुढे आल्याचे दिसले.