बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा
.
बोळेगाव बु....... बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26/1/2021 रोजी सोशल डिशटंश नियमाचे पालन करुन 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी प्रजासत्ताक दिना विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे,ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर, शाळेतील शिक्षिका आशा मुळे, मजलसा पुठठेवाड आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष नरवडे व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांनी मानले.
No comments:
Post a Comment