Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, January 27, 2021

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॅनिटायजेशन, मास्क, पल्स, तापमान व साफसफाई करुन शाळा मोठ्या उत्साहाने शाळा सुरू करण्यात आली

*बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॅनिटायजेशन, मास्क, पल्स, तापमान व साफसफाई करुन  शाळा मोठ्या उत्साहाने शाळा सुरू करण्यात आली










*


.बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला  असून ऑफलाइनसह ऑनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले .
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिल्यानंतर  शाळा व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली. आज दिनांक 27/1/2021  रोजी सकाळी पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली. सोमवारीच स्वच्छतेस शालेय व्यवस्थापनाने सुरुवात केली. बोळेगाव बु. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलकलेखन आणि सजावट करण्यात आली आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सूचना जागोजागी लावण्यात आल्या आहेत. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात आले, सुरक्षित अंतराच्या पालनासाठी खुणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, फक्त तीन विषयांच्या अध्यापनास तूर्तास परवानगी दिली   व अध्यापनास सुरुवात करण्यात केली. 
विद्यार्थी, शिक्षक या व्यतिरिक्त इतर कुणालाही शाळेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. तासिका संपल्यानंतर प्रत्येक वर्गाचे निर्जंतुकीकरण होईल. मास्कचा वापर अनिवार्य आहे. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
असे शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांनी सांगितले. व आज इयत्ता पाचवी ते आठवी विषय शिक्षक श्री सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानोबा कंजे व श्रीमती मजलसा पुठठेवाड आदी जण उपस्थित होते.










No comments:

Post a Comment