Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 2, 2021

विज्ञान विषयातील बेसिक माहिती


काही महत्वाची एकके :
कॅलरी - उष्णता मोजण्याचे एकक
 पौंड - वजन मोजण्याचे एकक
 बार - वायुदाब मोजण्याचे एकक
 अँगस्ट्रॉंम - प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
 प्रकाशवर्ष - तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
 फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक
 नॉट - सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
 अॅम्पीअर - विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
 हर्टझ - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
 मैल - अंतर मोजण्याचे एकक
 एकर - जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
 दस्ता - कागदसंख्या मोजण्याचे एकक
 हॉर्सपॉवर - स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक
 वॅट - शक्तीचे एकक
 रोएंटजेन - क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
 गाठ - कापूस गाठी मोजण्याचे एकक
 हँड - घोड्याची उंची मोजण्याचे एकक
 मायक्रोन - लांबीचे वैज्ञानिक एकक

मूलद्रव्ये व संज्ञा :
अॅल्युमिनियम - A1
 बेरीअम - Ba
 कोबाल्ट - Co
 आयोडीन - I
 मॅग्नेशिअम - Mg
 मॅग्नीज - Mn
 निकेल - Ni
 फॉस्फरस - P
 रेडीअम - Ra
 सल्फर - S
 युरेनिअम - U
 झिंक - Zn
 चांदी - Ag
 सोने - Au
 तांबे - Cu
 लोखंड - Fe
 पारा - Hg
 शिसे - Pb
 कथिल - Sn
 टंगस्टन – W
खनिजद्रव्य व त्याचे उपयोग :
शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज - फॉस्फरस  -
उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
 अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
 स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या
खनिज - पोटॅशियम-
उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता
 अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो
 स्त्रोत - सुकी फळे
खनिज - कॅल्शियम-
उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
 अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
 स्त्रोत - तीळ व पालेभाज्या
खनिज - लोह-
उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
 अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  
 स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
खनिज - तांबे-
उपयोग - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
 अभावी होणारे परिणाम - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
 स्त्रोत - पालेभाज्या
खनिज - सल्फर-
उपयोग - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
 अभावी होणारे परिणाम - केस, हाडे कमकूवत होतात
खनिज - फ्लोरिन-
उपयोग - दातांचे रक्षण करण्याकरिता,
 अभावी होणारे परिणाम - याच्या अभावी दंतक्षय होतो.
खनिज - सोडीयम-
उपयोग - रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
 अभावी होणारे परिणाम -  रक्तदाबावर परिणाम होतो.  
खनिज - आयोडीन  -
उपयोग - थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
 अभावी होणारे परिणाम - गलगंड नावाचा आजार होतो.

अन्नपचन प्रक्रिया :
सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
 अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात. या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते. या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
 खलेल्ले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो.
 अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
 
1. अंग पदार्थ - मुख व गुहा
स्त्राव - लाळ  
 विकर - टायलिन
 माध्यम - अल्पांशाने
 मूळ अन्न पदार्थ - पिष्टमय पदार्थ  
 क्रिया आणि अंतिम - शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ - जठर
स्त्राव - हायड्रोक्लोरिक
 माध्यम - आम्ल, अॅसिड  
 मूळ अन्न पदार्थ - प्रथिने  
 क्रिया आणि अंतिम - जंतुनाशक
3. अंग पदार्थ - जठररस  
स्त्राव - पेप्सीन,रेनीन
 माध्यम - आम्ल
 मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, दूध
 क्रिया आणि अंतिम - सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर 
4. अंग पदार्थ - लहान आतडे
स्त्राव - पित्तरस
 माध्यम - अल्कली
 मूळ अन्न पदार्थ - प्रथिने व मेद
 क्रिया आणि अंतिम - मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे
5. अंग पदार्थ - स्वादुपिंडरस  
विकर - ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
 माध्यम - अल्कली, अल्कली
 मूळ अन्न पदार्थ - प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
 क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ - आंत्ररस
विकर - इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
 माध्यम - अल्कली
 मूळ अन्न पदार्थ - प्रथिने, शर्करा, मेद  
 क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल

No comments:

Post a Comment