🙎♀️ *रक्षाबंधन निमित्ताने खास कविता वाचा*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
*"बहिणी ह्या अशाच असतात.....!!!!"*
हृदयाला झालेल्या जखमा लपवत, हसत असतात.
डोळ्यातले अश्रू पापण्यांच्या
कडांवर थोपवत असतात.
*बहिणी अश्याच असतात.*
माहेरी झालेला अपमान
काळजात लपवून ठेवतात.
माहेरचा सन्मान दिमाखात
जगाला सांगत सुटतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात*
सासरी पंचपक्कवान खातात पण,
भावाच्या घरी वरणभात खाऊन तृप्तीचा ढेकर देतात.
*बहिणी अश्याच असतात.*
हजारोचा शालू.. साड्या
कपाटात धूळ खात पडलेल्या असतात
पण भाऊबीजेच्या साडीसाठी
भावावर रुसत असतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात.*
http://bit.ly/read-more-poems
भावाच्या घरी सासुरवाडीची वर्दळ
बघून नजरेआड करतात.
आपल्या वेळेलाच वहिनीला
कसं बाहेर जायचं असतं.
ह्या प्रश्नाचं उत्तरचं
शोधायचं टाळतात.
*बहिणी अश्याच असतात*
लग्नमांडव जरी भरला पाहुण्यांनी,
सगळ्यांशी बोलता बोलता
हळूच रस्त्याकडे नजर मारतात.
अजून भाऊ कसा आला नाही,
म्हणून अस्वस्थ होतात.
*बहिणी अश्याच असतात.*
भाऊ मंडपात आला की,
उत्साहात सळसळून जातात.
भावाने आणलेली
काकणाची साडी नेसून
मंडपभर मिरवत राहतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात.*
http://bit.ly/read-more-poems
माहेरच्या साडीसाठी
रुसणाऱ्या बहिणी
शेवटच्या प्रवासाला निघताना
भावाचीच साडी नेसतात
*बहिणी ह्या अश्याच असतात.*🙏
...
*।। बहिण ।।*
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई
-------------------------------------------------------
*रक्षा बंधन च्या आपणास हार्दिक शुभेच्छा.*
#सैन्यात_असलेल्या_भावाला_बहिणीचे_पत्र
प्रिय दादा,
रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा 😊
यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि म्हणूनच तू आपल्या या लहानग्या बहिणीला स्वरक्षणासाठी बालपणापासूनच सबल बनविले. तुझ्यामुळेच मी क्रिडा स्पर्धेत सहभागी व्हायला लागलेले, आजही कॉलेजमध्ये कुठल्याही खेळात मी मागे नाही. सोबतच तुझ्यामुळे मिळालेले कराटे प्रशिक्षण मला स्वतः च्या रक्षणासाठी आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे. या सगळ्यामुळे माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच संपूर्ण श्रेय तुलाच आहे दादा. घरी आई बाबांना तुझी उणीव भासू नये म्हणून बाहेरचे सगळे व्यवहार तू मला शाळेपासूनच शिकविले. बॅंकेचे काम असो किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार, तू अगदी मला सोबत घेऊन करत आलास आणि त्यामुळेच मी आज अगदी आत्मविश्वासाने सगळं सांभाळते.
तुझ्या साठी देशभरातून अनेक राख्या येतात, शाळकरी मुली हातावर राख्या बांधतात तेव्हा तुला माझी आठवण येते असं तू म्हणालास मागच्या वर्षी पण दादा तू मला स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप तत्पर बनविले आहेस पण या भारतमातेला तुझ्या रक्षणाची खूप गरज आहे तेव्हा माझी रक्षा कर असं न म्हणता या भारतमातेच्या रक्षणासाठी असंच कायम लढत रहा हीच माझी इच्छा.
दादा, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. अख्ख्या देशातील बहिणींना तुझ्या सारख्या भावाची गरज आहे, तुझ्यामुळे अख्खा देश शांतपणे जगू शकतो, झोपू शकतो. आपल्या या देशात कुठेही काही संकट आलं तरी तू मदतीला धावून जातो तेव्हा संकटात सापडलेल्या प्रत्येक बहिणीला तुझा अभिमान वाटतो, तुला मनोमन ती खूप आशिर्वाद देते. त्या संकटात सापडलेल्या प्रत्येकाला.अगदी ईश्वरा समान भासतो तू. यापेक्षा मोठे गिफ्ट माझ्यासाठी काय असणार दादा. जेव्हा तुझ्या कौतुकाचे गोडवे अख्खा देश गातो त्या क्षणी मला खरंच तुझी बहीण असल्याचा खुप अभिमान वाटतो.
पत्रा सोबत राखी सुद्धा पाठवत आहे. तसं पाहिलं तर आपलं बहिण भावाचं नातं या राखीच्या रेशमी धाग्यापेक्षा तुझ्या कडून मला मिळालेल्या स्व रक्षणाच्या धड्यांमुळे अजूनच घट्ट झालं आहे. दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस. जिवाची पर्वा न करता मातृभूमीसाठी लढणार्या माझ्या दादाचं आणि माझं असं एक अनोखं बंधन आहे ज्याला कशाचीही तोड नाही.
तू घरी आलास ना की आपण सगळे सण एकदाच साजरे करू. तेव्हा आता पत्र वाचून माझी आठवण आली तरी निराश न होता असाच भारतभूमीच्या रक्षणासाठी लढ.
इकडे आम्ही सगळे ठिक आहोत. आमची काळजी करू नकोस.
तुझीच लाडकी,
मिनू
खुप छान आहे मन लाऊन जर वाचली तर डोळ्यातून चटकन पाणी येईल अशी सुंदर कविता
➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment