Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, August 19, 2022

अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित

*अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दहीहंडीचा उत्सव आयोजित*

*तिवटग्याळ - आज दि.19-8-2022 रोजी अंगणवाडी व तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या वतीने आज दिनांक 19/8/2022 अंगणवाडी  अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, शिक्षण प्रेमी कू. शुभांगी पाटील आदी जणांच्या पुढाकाराने अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आज वाजत गाजत गोविंदा गीत व वेशभूषेत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व शिक्षण प्रेमी कु. शूभांगी पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाची माहिती सांगितली श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात बरेचशे सण साजरे केले जातात, त्यातलाच एक सण म्हणजे दही हंडी, बाकीचे सण जेवढ्या आनंदात साजरे केले जाते तेवढ्याच आनंदात दही हंडीच्या सणाला सुद्धा साजरे केल्या जातं, दही हंडीला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरे केल्या जाते, तसेच भारतात इस्कॉन संस्थेच्या द्वारे सुद्धा दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो अशी सविस्तर माहिती सांगितली. चला तर आपण दही हंडी हा खेळ उत्सव साजरा करुया अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना गोविंदा ला घेऊन दहीहंडी फोडली. अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थी गोविंदा झाल्याने अतिशय सुंदर व मनमोहक रिंगण करून दहीहंडी साजरी केली. विद्यार्थ्याच्या आनंदात सर्व जण सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी खूपच उत्स्फूर्त पणे गोविंदा गीते सादर केली. या दहिहंडी उत्सवासाठी अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व शिक्षण प्रेमी कु. शुभांगी पाटील यांनी परीश्रम घेतले*











































No comments:

Post a Comment